Hartalika Tritiya 2023: यंदा कधी आहे हरतालिका तृतीया? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

हरतालिका देवींच्या मूर्तींचे विसर्जन कधी करावं?
Hartalika Tritiya 2023
Hartalika Tritiya 2023esakal

Hartalika Tritiya 2023: मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागतं. आणि ते भाग्य आपलंही असावं असं प्रत्येकीला वाटतं. यासाठीच आपल्या पुराणांमध्ये काही व्रत वैकल्ये सांगितली आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध व्रत म्हणजे हरतालिका होय.

हरतालिकेचे व्रत केल्याने इच्छित वर प्राप्ती होते असे शास्त्रातही सांगितले आहे. त्यामुळेच ज्यांचे विवाह ठरत नाहीत अशा कुमारीका हरतालिकेचे व्रत करतात. तर, ज्या महिला लग्नाआधी हे व्रत करायच्या त्या लग्नानंतरही ते कायम ठेवतात.

पश्चिम महाराष्ट्रात या व्रताला खास महत्त्व आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हे व्रत मनोभावे करते. हे व्रत तुम्हीही करणार असाल तर ते कसे करायचे त्यासाठी काय तयारी असते हे पाहुयात.

Hartalika Tritiya 2023
हरतालिका तीज का साजरी केली जाते?

हरतालिका पूजा कशी करावी?

व्रताच्या दिवशी सकाळी सर्व विधी आटोपल्यानंतर हरितालिका व्रताचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पाने अर्पण केली जातात.

या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो. फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मूर्तींचं विसर्जन करून व्रत सोडले जाते.

Hartalika Tritiya 2023
रत्नागिरी-हरतालिका पुजनाची स्थानिक सुट्टी रद्द

कधी आहे हरतालिका?

देशातील अनेक राज्यांत हरतालिका व्रत विविध पद्धतीने साजरे केले जाते. महाराष्ट्रात हे व्रत देवींच्या मूर्ती पूजूनही होते. यावर्षी १८ सप्टेंबर रोजी हरतालिका तृतीया साजरी केली जाणार आहे. दिवसभर उपवास असल्याने हे व्रत दुसऱ्यादिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला सोडावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com