Kolhapur Ganpati Visarjan : महानगरपालिकेच्या 'या' आवाहनानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; पंचगंगा नदी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त

कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Ganeshotsav) मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो.
Kolhapur Ganpati Visarjan 2023
Kolhapur Ganpati Visarjan 2023esakal
Summary

महापालिकेकडून पंचगंगा नदीत (Panchganga River) गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kolhapur Ganpati Visarjan 2023 : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Ganeshotsav) मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. दरम्यान, आज (शनिवार) गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जनाने घरगुती गणेशोत्सवाची सांगता होणार आहे.

Kolhapur Ganpati Visarjan 2023
Sadabhau Khot : 'दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले, आता त्यांनी पैरा फेडावा'

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांसोबतच कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) सज्ज झालीये. काल (शुक्रवार) गौराईची पूजा करण्यात आली. आज उत्सवाचा पाचवा दिवस असून लाडक्या गणरायाला अनेक घरांतून निरोप दिला जातो.

Kolhapur Ganpati Visarjan 2023
Sharad Ponkshe : 'बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता'

इराणी खणीत होणार गणेशमूर्तींचे विसर्जन

महापालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आलीये. जास्तीत-जास्त गणेश मूर्तींचं विसर्जन व्हावं, यासाठी महापालिकेच्या इराणी खण इथं गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलीये. या इराणी खणीत साधारण कोल्हापूर शहरासह परिसरातील 60 ते 65 हजार घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे, असा अंदाज वर्तवला आहे.

Kolhapur Ganpati Visarjan 2023
Miraj Ganeshotsav : ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, वाद चिघळण्याची शक्यता

हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध

दरम्यान, या विसर्जन सोहळ्यासाठी महापालिका अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून महापालिकेकडून पंचगंगा नदीत (Panchganga River) गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, याला हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Sangathan) तीव्र विरोध दर्शवला आहे. सध्या पंचगंगा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात तणावाचं वातावरण दिसू लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com