उमरगा व्यापारी गणेश मंडळाने उभारले 'विघ्नेश्वर विनायक' मंदिर 

ganesh umarga.jpg
ganesh umarga.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहरातील विविध गणेश मंडळाने केलेल्या कार्याला सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. सार्वजनिक महादेव गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ, महाराष्ट्र गणेश मंडळाच्या कार्याला जुनी परंपरा आहे. अलीकडच्या काळात गणराज गणेश मंडळाचे कार्य उल्लेखनिय आहे. दरम्यान यंदा गणेश उत्सवाच्या परंपरेला कोरोनाच्या संकटामुळे बंधने आल्याने उत्सवाचे स्वरूपच पालटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदा शहरात पाच गणेश मंडळांनी श्रीची स्थापना केली आहे. शहरात तशी श्री गणेश सार्वजनिक उत्सवाची परंपरा साधारणतः १९६१ पासून सुरू झाली. तत्कालिन स्थितीत (कै.) दिगंबर पुदाले, (कै.) पांडूरंग सूर्यवंशी, मल्लिनाथ स्वामी, के. टी. पाटील आदींनी एकत्र येत प्रथम सार्वजनिक भारत गणेश मंडळाची स्थापना केली.

याच कालावधीत काही युवकांनी एकत्र येत महाराष्ट्र गणेश मंडळाची स्थापना केली. १९७२ पासून व्यापारी गणेश मंडळ विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यास शहरातील जयहिंद गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेवून गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. (कै.) ओ. के. पाटील, राजशेखर चिंचोळे, सिद्रामप्पा चिंचोळे, सूर्यकांत दळगडे, शिवशंकर माळगे, (कै.) अशोक शिंदे, (कै.) दिलीप उपासे, (कै.) अनिल माळी, (कै.) महादेवप्पा दळगडे, (कै.) जवाहरलाल गांधी, माधवराव खरोसेकर, (कै.) सदानंद पोतदार, (कै.) शिवलिंग माळी आदीच्या प्रेरणेतुन व्यापारी गणेश मंडळाने वीस वर्ष सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून १९९५ मध्ये शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी मुख्य बाजारपेठेत विघ्नेश्वर विनायक मंदिराची उभारणी केली. मंडळाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ वर्षापासून प्रतिवर्षी मंदिर स्थापनेचा वर्धापनानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात.

पानटपरीत गणरायाची स्थापना
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदाचा गणरायाचा उत्सव अंत्यद साधेपणाने साजरा केला जातोय. शहरात पन्नासहुन अधिक मंडळाकडून श्रीची स्थापना केली जाते. मात्र यंदा केवळ पाच मंडळाने श्रीची स्थापना केली आहे. ६२ व्या वर्षात पदार्पन केलेल्या सार्वजनिक महादेव गणेश मंडळाने छोटेखानी शेडमध्ये श्रीची स्थापना केली आहे.

आरोग्य उत्सव

१९६१ मध्ये स्थापना झालेल्या महाराष्ट्र गणेश मंडळाने (आजोबा गणपती) यंदा रक्तदान शिबीर, परिसर स्वच्छता, वृक्षारोपन व कोरोना योध्दांचा सत्कार असे कार्यक्रम घेतले. अध्यक्ष आकाश इंडे व सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. उपक्रमशील असलेल्या गणराज गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी पाटील यांनी यंदा स्वतःच्या दुकानात श्रीची स्थापना केली. इंदिरा युवक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजीव दामशेट्टी यांनी कोरोनाच्या स्थितीमुळे मोठे कार्यक्रम रद्द करून पानटरीत गणरायाची स्थापना केली आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे विविध उपक्रमाला फाटा देऊन कोविड सेंटरमधील रुग्णांना अल्पोपहार व जेवण तसेच ईदगाह कोविड सेंटरला आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. 
बालाजी पाटील, अध्यक्ष गणराज गणेश मंडळ.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com