Ganeshotsav 2022 : गणेशच्या नैवेद्यासाठी तुम्ही हे काही खास पदार्थ नक्की ट्राय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022 recipe

Ganeshotsav 2022 : गणेशच्या नैवेद्यासाठी तुम्ही हे काही खास पदार्थ नक्की ट्राय करा

सध्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमण झालं आहे. त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न आहे. गणेशाला मोदक आणि खीर आवडते. गणेश चतुर्थी दिवशी हा नैवेद्य गणरायाला दाखवला जातो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी मोदक बनवले जातात. मात्र इतर दिवशी गणेशाच्या नैवद्यासाठी कोणते पदार्थ तयार करावेत असा प्रश्न सर्व महिला मंडळाला पडला असावा. (Ganeshotsav 2022 recipe)

अशावेळी गणेशाला फक्त मोदक आणि खीर हाच नैवेद्य देऊ शकता असे नाही तर, इतरही अनेक पदार्थ तयार करु शकता. पाच ते सात दिवस घरगुती गणपतींच्या आगमणा दरम्यान, तुम्ही काही पदार्थ तयार करु शकता. त्या पदार्थांची यादी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यात तुम्ही पुरण पोळी, शिरा, पाटोळी इत्यादी पदार्थांचा समावेश करु शकता.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: गणपती बाप्पा करीता दिल्ली स्पेशल पनीर मोदक कसे तयार करायचे?

पाटोळी

गणेश चतुर्थीवेळी गौरी पूजेसाठी पोटाळी बनवली जाते. ही वडी बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा रोल करा आणि त्यात किसलेले खोबरे आणि गूळ टाकून ताज्या हळदीच्या पानात वाफ घेऊन शिजवा.

पुरण पोळी

पुरण म्हणजे सारण आणि पोळी म्हणजे एक गोल पातळ मैद्याची किंवा पोळी आट्याची पोळी होय. चवीला गोड असणारी ही पुरणपोळी महाराष्ट्रात अनेक सणांसाठी बनवली जाते. शिजवलेल्या हरभरा डाळीत वेलची आणि केशर टाकून सारण केले जाते, त्याला पुरण असे म्हणतात. यानंतर हे पुरण पिठात हलके दाबून बसवून त्याची पोळी लाटली जाते. आणि पोळीच्या तव्यावर तूप लावून भाजली जाते.

नारळाचे लाडू

नारळाचे लाडूही नैवेद्यासाठी एक चांगली मिठाई म्हणून वापरु शकता. हा पदार्थ गणेश चतुर्थीवेळी बनवला जाऊ शकतो. हे लाडू बनवण्यासाठी दूध, कंडेन्स्ड मिल्क आणि किसलेले खोबरेही वापरता येते.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून घरच्या घरी तयार करा परफेक्ट मोदक

मौल

हा एक प्रकारचा पारंपारिक हलवा आहे. हा पदार्थ भरपूर सुका मेवा आणि तूप घालून शिजवला जातो. गणेश चतुर्थीवेळी अनेकजण प्रसाद म्हणून याचा वापर करतात.

गुजिया

गुजिया हा एक उत्तर भारतीय गोड पदार्थ आहे जो सहसा होळीच्या वेळी तयार केला जातो. हा मैद्यापासून बनवला जातो. ज्यामध्ये खोबरे, ड्रायफ्रूट्स, रवा आणि साखर मिसळून ते तेलात तळलेले असते.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : बाप्पासाठी बनवा खास चॉकलेट, पान अन् ड्रायफ्रूट्स मोदक, पाहा रेसिपी

Web Title: Ganesh Utsav 2022 Five Recipe For Bhog Of Lord Ganesha During Ganesh Chaturthi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..