esakal | गौराईला आवडतात कोकणातले घावन घाटले; जाणून घ्या सोपी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

गौराईला आवडतात कोकणातले घावन घाटले; जाणून घ्या सोपी रेसिपी

घावन घाटल्याचा नैवेद्य गौरी जेवणाच्या दिवशी कोकणात दाखवतात.

गौराईला आवडतात कोकणातले घावन घाटले; जाणून घ्या सोपी रेसिपी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

भाद्रपद महिन्यात गौरी जेवणाच्या दिवशी हा पदार्थ कोकणस्थ लोकांकडे नैवेद्यासाठी केला जातो. तसेच, तान्ह्या बाळाचा एक महिन्याचा वाढदिवस असतो, तेव्हाही घावन-घाटले करण्याची पध्दत आहे. घावन घाटल्याचा नैवेद्य गौरी जेवणाच्या दिवशी कोकणात दाखवतात. चला तर मग या उत्सवी वातावरणात घावन घाटल्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

हेही वाचा: 'गौरीई'च्या नैवद्यासाठी लागणारी मिक्स भाजी; जाणून घ्या रेसिपी

घावनासाठी साहित्य:

- आंबेमोहर तांदूळ धुऊन वाळवून त्याची केलेली पिठी- चार वाट्या,

- मीठ चवीपुरते

- पाणी

- तेल

घाटल्यासाठी

- एक- मोठा नारळ

- खसखस भाजून त्याची पूड- एक टेबलस्पून

- तांदळाची पिठी- पाव वाटी

- पाणी

- साखर- दीड ते दोन वाट्या

- वेलदोडा पूड

हेही वाचा: रेसिपी : महालक्ष्मी स्पेशल ज्वारीची आंबील

साहित्य:

- सुरवातीला एक मोठा नारळ खवून त्यात दोन वाट्या गरम पाणी घालून मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घ्या.

- नंतर तो खिसलेले नारळ स्वच्छ फडक्यावर ओतून पिळून दूध काढा.

- दुधात पाव वाटी तांदळाची पिठी गुठळी होऊ न देता चांगली मिक्स करा.

- खसखशीची पूड, वेलदोडा पूड घालून अजून दोन वाट्या पाणी व साखर घालून ढवळा आणि उकळवा. म्हणजे आता तुमचे घाटले तयार झाले.

हेही वाचा: 'गौराई'च्या शिदोरीसाठी लागणारी आळूच्या वडीची खास रेसिपी

घावन:

- घावन करण्यासाठी साधारणपणे दोन-तीन तास आधी तांदूळ पिठीमध्ये चवीपुरते मीठ घालून पाण्याने धिरड्याच्या पिठाइतपत पातळ भिजवून ठेवा.

- घावन करताना तवा किंवा नॉनस्टिक तवा चांगला तापल्यावर त्याला कापड्याच्या बोळ्याने सगळीकडे तेल लावून, त्यावर डावाने पिठाचे पातळ घावन (धिरडे) घाला.

- त्यावरुन परत तेल सोडा.

- त्यावर झाकणी ठेवून दोन मिनिटांनी झाकणी काढून घावण उलटा करा. छान जाळी पडलेली दिसते. परत वरुन थोडेसे तेल सोडा. नंतर घावन झाकू नये. एक मिनिटाने काढून पानात वाढा. त्याच्याबरोबर खाण्यास वाटीत घाटले द्या.

- गरमागरम घाटले नुसते पिण्यासही छान लागते.

loading image
go to top