esakal | 'गौरीई'च्या नैवद्यासाठी लागणारी मिक्स भाजी; जाणून घ्या रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

'गौरीई'च्या नैवद्यासाठी लागणारी मिक्स भाजी; जाणून घ्या रेसिपी

सकाळपासून गौरीच्या आगमणासाठी महिलावर्ग गडबडीत आहे. गौरीचे आवाहन झाले की, तिला भाजी-भाकरीचा नैवेद्य चढवला जातो.

'गौरीई'च्या नैवद्यासाठी लागणारी मिक्स भाजी; जाणून घ्या रेसिपी

sakal_logo
By
स्नेहल कदम

आली गवर आली..! गणरायाच्या दोन दिवसाच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ganesh Festival 2021) आज त्याच थाटामाटात जेष्ठ गौरीचे आगमण सुरु झाले आहे. सकाळपासून गौरीच्या आगमणासाठी महिलावर्ग गडबडीत आहे. गौरीचे आवाहन झाले की, तिला भाजी-भाकरीचा नैवेद्य चढवला जातो. (Ganesh Festival Special dish) राज्यातील वेगवेळ्या प्रदेशात वेगवेगळ्या याबाबतीत परंपरा आहेत. विदर्भात यांना महालक्ष्मी म्हणून पूजले जाते. तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात गौरी-गंगा म्हणून त्यांची पूजा केली जाते. (Ganesh Chaturthi 2021)

आजच्या दिवशी 'गौरी'ला भाजी-भाकरी, आळूच्या पानाची वडी, मिक्स पाच पालेभाज्यांची भाजी, फळभाज्यांचे सार असा पंचपक्वानाच नैवेद्या चढवला जातो. या मिक्स भाजीमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या असतात. ज्यामधून शरीरासाठी पोषकतत्वे मिळतात. महिला वर्ग प्रदेशानुसार उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा नैवेद्य गौराईसाठी बनवतात. आज ही मिक्स भाजी कशी बनवावी हे आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Ganeshotsav Special : उकडीचे मोदक

साहित्य -

  • शेपू, चवळी, मेथी, चाकवत, भोपळ्याची पाने - आवश्यकतेनुसार

  • भिजवलेले तांदुळ आणि तुरीची डाळ

  • शेंगदाण्याचा कूट

  • तेल

  • चिरलेला बारीक कांदा - ४

  • चिरलेली बारीक मिरची - २

  • मीठ

कृती -

सुरुवातील मिळालेल्या किंवा उपलब्ध झालेल्या पालेभाज्या स्वच्छ धुवून, बारीक चिरुन घ्याव्या. पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात चिरलेली मिरची टाकावी. चिरलेला बारीक कांदा टाकून तो कांदा लाल-तांबुस होईपर्यंत भाजून घ्यावा. यानंतर त्या मिश्रणात शेंगदाण्याचा कूट आणि भिजवलेले तांदुळ आणि तुरीची डाळ टाकावा. ते नीट परतून घ्यावे. हे मिश्रण थोडे भाजले की यात चिरलेल्या भाज्या घालून ते पुन्हा परतून घ्या. यावेळी एक महत्वाचा गोष्ट म्हणजे भाज्या शिजवताना त्या वाफेवर शिजवायच्या आहेत. भाजी जास्त शिजली तर तिची चव बदलु शकते. यानंतर मीठ घालून पुन्हा एकदा झाकण ठेवून तयार भाजीला वाफेवर शिजू द्या. सुमारे २० मिनीटांनंतर भाजी शिजेलेला वास येईल यावेळी ते पॅन उतरवून तुम्ही गरमागरम भाकरी आणि वडीसोबत ही भाजी खाऊ शकता.

हेही वाचा: आईच्या हातची पुरणपोळी मला सर्वात जास्त प्रिय : प्राजक्ता हनमघर

loading image
go to top