फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे होणार 5 लाख मृत्यू?-WHO

corona
coronaesakal

अवघ्या जगभरात कोरोनाने (coronavirus) थैमान घातले आहे. याच कोरोनामुळे जवळपास प्रत्येक देशात मृत्यूचा (corona death) आकडाही भयावह होता. अशातच काही देशातील परिस्थिती जरी सुधारत असली तरी पुन्हा एकदा हीच परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक.....

कोरोनाची भीती जरी ओसरत असली तरी काही देश यापूर्वी आलेल्या लाटेचा सामना करत आहेत. तसेच फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच लाख जणांचा मृत्यू होण्याची भिती जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) विभागीय कार्यलयाचे प्रमुख डॉ. हैन्स क्लूज यांनी गुरुवारी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, या देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक वाढू लागली आहे. या देशातील वाढणारी रुग्णाची संख्या चिंतादायक आहे. युरोप आणि मध्य आशियातील तब्बल 53 देशात कोरोना महामारीची आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे.

corona
नोटाबंदीची पाच वर्षे! लोकांकडील वाढली कॅश; आतापर्यंतच्या उच्चांकावर

WHO ने व्यक्त केली भिती

युरोप आणि मध्य आशियातील 53 देशात आणखी एका लाटेचा धोका असून फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भिती WHO ने व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारी संकटानं अनेकांचं जीव घेतले आहेत.

corona
'मराठी माणसाच्या भरवशावर राजकारण करायचं अन्...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com