'छोकरी के लिए नोकरी छोड दी!' खऱ्या प्रेमासाठी 50 तरुणींना करतोय डेट

एका मुलाने खऱ्या प्रेमासाठी चक्क नोकरी सोडली.
 '50 Dates 50 States'
'50 Dates 50 States' sakal

प्रत्येकाला असं वाटतं की त्यांना एक चांगली नोकरी मिळावी आणि सोबतच एक चांगली जीवनसाथी. चांगल्या पार्टनर साठी मुलं तर कित्येकदा खुप चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. खरं प्रेम मिळावं यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. सध्या गाजत असलेल्या प्रकरणात एका मुलाने खऱ्या प्रेमासाठी चक्क नोकरी सोडली. हो, हे खरंय.

अमेरिकेतील २५ वर्षीय तरुणाने नोकरी सोडून डेटींगला आपले मिशन बनवले. त्याने अमेरिकेतील प्रत्येक राज्यातील एका मुलीला डेट करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचं हे मिशन आता यशस्वी होणार आहे. त्याने या मिशनला '50 Dates 50 States' असं नाव दिलयं. (a young man quit job for true love a new mission of dating 50 girls )

 '50 Dates 50 States'
Viral Video : अ‍ॅम्ब्युलन्स मिळेना; पेशंटला थेट जेसीबीतून नेलं दवाखान्यात

मैथ्यू वर्निग असे या तरुणाचे नाव आहे. तो अमेरिकेतील मोंटाना येथे राहतो. तो आपल्यासाठी परफेक्ट पार्टनर शोधतोय. यासाठी त्याने नोकरीही सोडली आणि आता अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात कारनी फिरतो. त्याने आपल्या कारवर '50 dates 50 states' लिहिले आहे.

लॉकडाउनमध्ये फनसाठी मैथ्यूनी टिंडर जॉईन केले होते. डेटिंग app वर त्याने फक्त पाच महिलांना डेट केले होते. आतापर्यंत त्याने अमेरिकेतील 50 राज्यातील एक-एक महिलांना डेट केले आहेत. या एडवेंचर बद्दल सोशल मीडियावर अपडेट्स दिल्याने त्याचे टि-टॉक वरील फॉलोअर्सची संख्या ६ लाखावर पोहचली. वह मैथ्यू या एडवेंचरला समोर सुरू ठेवण्यास इच्छूक आहे.

 '50 Dates 50 States'
Viral Video : 'सामी सामी...' गाण्याची क्रेझ, चिमुकल्यांनाही लागलंय वेड

मैथ्यू या संदर्भात आपला अनुभव शेअर करताना म्हणतो की पँडेमिकच्या आधी मी फक्त पाच महिलांना डेट केले होते आता ही संख्या जवळपास १०० वर गेली आहेत. परंतू मी अजूनही महिलांना समजू शकलो नाही.

सध्या मैथ्यू सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. मैथ्यूच्या '50 dates 50 states' या मिशनची सध्या बरीच चर्चा होतेय. या मिशनवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com