गर्लफ्रेंडसोबत भांडण पडलं महागात, रागाच्या भरात केले ४० कोटींचे नुकसान

एका तरुणाचं गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं आणि या भांडणानंतर तरुणाने रागाच्या भरात ४० कोटींचं नुकसान केलंय.
a young man dispute with girlfriend
a young man dispute with girlfriendsakal

हल्ली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची भांडण सामान्य गोष्ट झाली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरुन या नात्यात भांडणे होत असतात. अश्याच एका गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणानंतर तरुणाने जे केले, ते थक्क करणारं आहे. एका तरुणाचं गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं आणि या भांडणानंतर तरुणाने रागाच्या भरात ४० कोटींचं नुकसान केलंय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

a young man dispute with girlfriend
तरुणाचे प्रपोज करण्याचे स्वप्न भंगले, दोघात आला तिसरा, पहा Video

अमेरिकेतील डॅलस शहरात राहणाऱ्या तरुणाने ब्रायन हर्नांडेझ याने आपल्या गर्लफ्रेंडशी भांडण केल्यानंतर एका संग्रहालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याने एका म्युझियममध्ये घुसून 2,500 वर्षे जुन्या जवळपास तीन प्राचीन ग्रीक कलाकृती रागाच्या भरात फोडल्या. या कलाकृतींची किंमत जवळपास 40 कोटी रुपये आहे.

विशेष म्हणजे त्याने स्वत: पोलिसांना याबाबत माहिती दिली व त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला कारण विचारले असता त्याने गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे सांगितले.

a young man dispute with girlfriend
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

ब्रायनने स्वत: पोलिसांना याबाबत माहिती दिली. मात्र पोलिसांना घटनेचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपुर्ण प्रकार दिसून आला. त्यानंतर ब्रायनला अटक करण्यात आली. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजतयं. विशेष म्हणजे गर्लफ्रेंडशी भांडल्यावर असं कृत्य कोणी करतं का असा प्रश्न नेटकरी विचारत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com