Trump is Back on Twitter : इलॉन मस्कच्या 'पोल'मुळे डोनाल्ड ट्रंपची ट्वीटरवर वापसी

इलॉन मस्क यांनी केलेल्या ऑनलाइन पोलवरील यूजर्सच्या आलेल्या रिअॅक्शन पाहून डोनाल्ड ट्रंप यांचे ट्वीटर अकाउंट पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.
Trump is Back on Twitter
Trump is Back on Twittersakal

जेव्हापासून इलॉन मस्क ट्वीटरचे मालक झाले आहेत तेव्हापासून ट्वीटवर अनेक बदल दिसून येत आहे. अशातच त्यांनी ट्वीट करत अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचे ट्वीटर अकाउंट पुन्हा सुरू करण्याबाबत युजर्सची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. यावर अधिकाअधिक यूजर्सनी हो असे उत्तर देत ट्वीटरवर ट्रंप यांचे अकांउट असावेत असे सांगितले होते.

इलॉन मस्क यांनी केलेल्या ऑनलाइन पोलवरील यूजर्सच्या आलेल्या रिअॅक्शन पाहून डोनाल्ड ट्रंप यांचे ट्वीटर अकाउंट पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. (Donald Trump is Back on Twitter )

Trump is Back on Twitter
Twitter : ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना ‘कू’चा आधार

लोकांची प्रतिक्रिया पाहून इलॉन मस्क यांनी एक लॅटिन फ्रेज ट्वीट केली ज्याचा अर्थ लोकांचा आवाज हाच देवाचा आवाज आहे, असा होतो. मस्क यांच्या ट्वीट नंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांचं ट्वीटर अकाउंट पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय. आता ट्रंप यांचं ट्वीटरवर @realDonaldTrump नावाचे अकाउंट आहे.

ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांनी 19 नोव्हेंबर रोजी ट्वीट करत डोनाल्ड ट्रंप यांचं ट्वीटर अकाउंट पुर्ववत सुरू करण्याबाबत लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. त्यासाठी त्यांनी पोल द्वारे 'हो किंवा नाही' मध्ये उत्तर मागितले होते. त्यावर पन्नासहून अधिक टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले होते. त्यामुळे आता डोनाल्ड यांचं ट्वीटर अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आलंय.

Trump is Back on Twitter
Elon Musk: धडाकेबाज निर्णयानंतर मस्क म्हणतात, ट्विटरसाठी आता वेळ नाही; कारण...

सत्ता परिवर्तन करताना डोनाल्ड ट्रंप यांचं अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. 6 जानेवारी, 2021ला यूएस कॅपिटल हिल हमल्यानंतर ट्रंप यांचं अकाउंट बॅन करण्यात आले होते.

मागील वर्षी अमेरिकेच्या निवडणूकीनंतर जो बाइडेन अमेरिकेचे राष्ट्रपती पदी निवडण्यात आले. या दरम्यान डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी व्हाइट हाउसच्या बाहेर आंदोलन केले. हिंसक आंदोलन बघून ट्विटर ने सुरवातीला ट्रंप यांचे अकाउंट 12 तासासाठी बॅन केले होते तर त्यानंतर पुर्णत: बंद करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com