गेम खेळताना चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबाकडून Tiktok विरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tiktok

गेम खेळताना चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबाकडून Tiktok विरोधात गुन्हा

एका 10 वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी टिकटॉकवर गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण फिलाडेल्फियामध्ये समोर आले आहे. या मुलीचा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात टिकटॉकवर ब्लॅकआउट चॅलेंज अंतर्गत गेम खेळत असताना मृत्यू झाला होता. आता तिच्या घरच्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा ताजे झाले आहेत. मृत मुलीचे नाव नायला एंडरसन आहे.

हेही वाचा: Video: लग्न होताच नवरा-बायकोने स्वतःला पेटवून घेतलं

सात डिसेंबरला नायला तीच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. ती टिकटॉकवर ब्लॅकआउट चॅलेंज अंतर्गत गेम खेळत होती. त्यानंतर तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण पाच दिवसांनी तीचा मृत्यू झाला. नायला हि अत्यंत हूशार मुलगी होती. तिला तीन वेगवेगळ्या भाषा बोलता येत होत्या.

याप्रकरणी आता मृत मुलीच्या कुटुंबीयानी टिकटॉकवर गंभीर आरोप लावले. टिकटॉकवर चुकीच्या उत्पादनाची मार्केटिंग होत असल्याने लहान मुलांवर वाईट परिणाम होतो, असे कुटूबीयांचे म्हणणे आहे. सोबतच मुलीच्या फॉर यू पेजवर अशा अनेक गोष्टी आढळून आल्या, ज्यामध्ये ती ब्लॅकआउट चॅलेंज अंतर्गत अत्यंत धोकादायक स्टंट करत होती.

हेही वाचा: सहाय्यक वैद्यकीय आत्महत्येला मान्यता देणारे कोलंबिया ठरलं पहिलं राज्य

या संपूर्ण प्रकरणावर टिकटॉकच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र जेव्हा नायलाचा मृत्यू झाला होता तेव्हा कंपनीच्या वतीने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात त्यांनी मुलीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता तसेच ब्लॅकआऊट चॅलेंज सुरवातीला टिकटॉकने सुरू केले नसल्याचे स्पष्टीकरण यात देण्यात आले होते. Tiktok युजर्सच्या सुरक्षेबाबत सावध भूमिका घेत असल्याचेही या निवेदनात सांगितले.

Web Title: As 10 Year Old Girl Died While Playing A Game In December 2022 A Complaint Filed Against Tiktok By Her Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deadglobal newsTikTok
go to top