Corona Update : जन्मदात्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; भारतालाही धोका?

China Covid
China Covid
Updated on

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचं जाळं पसरवणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगानं जारी केलेल्या माहितीनुसार चीनमध्ये आज ३२,९४३ तर काल म्हणजेच २४ नोव्हेंबरला ३१,६५६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. हा आकडा जरी ३०-३२ हजाराच्या घरात असला तरी चीनच्या १४० कोटी लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे, असं एका गटाला वाटतं. दुसरीकडे कडक लॉकडाऊन, प्रवासावर निर्बंध लावत ‘झिरो कोविड पॉलिसी’ राबवूनही चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक का होतोय? आणि याचा भारताला धोका आहे. (China Covid news in marathi)

China Covid
स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवरून सदावर्ते आक्रमक; म्हणाले खासदार ओमराजे...

नॅशनल हेल्थ कमिशनच्या माहितीनुसार या नव्या कोविडच्या लाटेत चीनमध्ये आतापर्यंत २ लाख ९७ हजार ५१६ कोविड रुग्णांची नोंद झालीए तर ५२३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर तिकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation) माहितीनुसार चीनमध्ये आतापर्यंत ९५ लाख २३ हजार १४ रुग्णांना कोरोनाची बाधा झालीए तर २९,८८९ जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. एकीकडे आकडेवारी कमी-अधिक वाटत असली तरी चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी राबवली जातेय.तरीही रुग्णसंख्येला ब्रेक का लागत नाही?

GFX PLATE- झिरो कोविड पॉलिसी राबवूनही रुग्णसंख्या का वाढते?

झिरो कोविड पॉलिसी म्हणजे ज्यात एखाद्या परिसरात एक किंवा हातावर मोजता येतील इतके कोविड रुग्ण आढळले तरीही लॉकडाऊन लावण्यात येत आहे. याचाच परिणाम गेल्या वर्षी शांघायमध्ये पाहायला मिळाला, ज्यात २५ लाख लोकांना लॉकडाऊनमध्ये डांबून ठेवलं. आताही चीनमधील काही भागात प्रत्येक घरातील केवळ एकाच व्यक्तीला दररोज ठराविक वेळेतच घराबाहेर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर, बीजिंगमधील काही भागात दर आठवड्यातून एकदा नागरिकांना कोविड चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

China Covid
Gunratna Sadavarte: पत्रकारांसमोर बायकोला मिठी मारत सदावर्तेंची आव्हाडांवर टीका; म्हणाले...

या झिरो कोविड पॉलिसीमुळे चीनमधील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली आणि लोकांचा जीव वाचला असला तरी, याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर झालेला दिसतोय हे ही नक्की.

दुसरीकडे तज्ज्ञांनी मात्र झिरो कोविड पॉलिसीवरुन चीन सरकारलाच धारेवर धरलंय. त्यांच्या मते, झिरो कोविड पॉलिसी राबवूनही चीनमधील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. कारण चीननं कोविडप्रति आपला Approach बदललेला नाही. इतर देश लसीकरणासह कोविडशी सामना करत असताना चीन मात्र अजूनही झिरो कोविड पॉलिसी कठोररित्या राबवून नागरिकांवर बंधनं लादत आहेत. ज्यातून मानवाधिकारांचंही उल्लंघन होत असल्याची टीका होतेय.

China Covid
Baba Ramdev: "संन्यासी आहात तर बायकांकडे बघता कशाला"; विद्या चव्हाण बरसल्या

GFX PLATE

मागील संसर्गापासून शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज

कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या विषाणूविरोधात नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती विकसित होते, असं बऱ्याच जर्नल्स आणि अभ्यासातून समोर आलंय. २०२१ मधील एका अहवालानुसार, SARS-CoV संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकेल याचा पुरावा देते.

द लॅन्सेटमध्येही म्हटलंय, की कोविड-१९ मधून बरे झालेल्या आणि SARS-CoV-2 अँडीबॉडीजसाठी सेरोपॉझिटिव्ह चाचणी केलेल्या लोकांमध्येही रिइन्फेक्शनचं प्रमाण कमी आढळून आलं आहे.

GFX PLATE- WHO काय म्हणतं?

चीनमधील झिरो कोविड पॉलिसीमुळे रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी WHOच्या म्हणण्यानुसार ही योजना दीर्घकाळ टिकणारी नाही. त्यामुळे चीननं वेळीच गरज ओळखून योजनेत परिवर्तन केलं पाहिजे असा सल्लाही WHO कडून देण्यात आलाय.

China Covid
Bisleri : कलीयुगात सात हजार कोटींच्या प्रॉपर्टीवर पाणी फेरणारी ३७ वर्षांची मुलगी

GFX PLATE- लसीकरणातील त्रुटी

मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरपर्यंत चीनमध्ये ३०० कोटी डोसची निर्मिती केली

त्यातून १२० कोटी (Billion) नागरिकांचं पूर्ण लसीकरण करण्यात आलं

तर, ८० कोटीहून अधिक नागरिकांना बूस्टर डोस दिला

लसीकरणानं विषाणूचा प्रसार थांबण्याची शक्यता कमी आहे. पण, यामुळे एखाद्या व्यक्तीला विषाणूशी प्रतिकार करण्याची शक्ती वाढते

तरी, चीनच्या झिरो कोविड प्रोग्रामच्या अयशस्वी होण्यामागे दोन कारणं आहेत-

पहिलं कमी प्रभावी लस आणि दुसरं लशीच्या दोन डोसमधील अंतर असं एका भारतीय वैद्यकीय तज्ज्ञाचं मत आहे. दुसरीकडे चीन परदेशी लशींना मान्यता देण्यास टाळाटाळ करतंय. कारण चीनमध्ये सध्या फक्त जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेल्या स्थानिक लशींनाच मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार, कोरोनाव्हॅक आणि सिनोफार्म लशीपासून रोगप्रतिकारशक्ती वेगानं कमी होते आणि वृद्धांनाही म्हणावं इतकं संरक्षण मिळत नाही. काही तज्ज्ञांनी तर, चीनमधील स्थानिक लशींच्या लसीकरणावरच सवाल उपस्थित केला आहे.

चीनमधील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चीनच्या ९० टक्के जनतेचं पूर्ण लसीकरण झालंय; त्यातील ८६ टक्के लोक हे ६० वर्षांवरील आहेत. चीनमधील कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६५ टक्के नागरिक हे ६० वर्षांवरील आहेत. ६५ वर्षांवरील नागरिक गंभीर आजारी असून त्यांचं मात्र लसीकरण केलेलं नाही.

China Covid
Gujarat Election 2022: ''अरविंद केजरीवालांची हत्या होऊ शकते'' मनोज तिवारींच्या अटकेची मागणी

GFX PLATE चीनमधील वाढत्या कोरोनावर उपाय काय?

तज्ज्ञांच्या मते, चीनला कोविड-१९ वर दीर्घकाळ परिणामकारक अशा उपायांवर विचार करावा लागेल. उदाहरणार्थ अधिक प्रभावी लशींचा वापर, अँटीव्हायरल औषधांचा वापर, सशक्त आरोग्य सेवा प्रणाली आणि लोकांशी चांगल्या पद्धतीनं संवाद करायला हवा...

त्यामुळे सर्वात आधी तर चीननं परदेशी लशींच्या वापराला परवानगी द्यायला हवी आणि आरोग्य सुविधांसाठीचा निधी वाढवायला हवा, जो इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

GFX PLATE भारताला धोका काय?

भारताची लोकसंख्या हे जसं देशासाठी वरदान आहे तितकंच ते धोक्याचंही ठरु शकतं. हे कोविडच्या मागील दोन लाटांमध्ये अनुभवायला मिळालंय. जरी कोविड आता इतका प्रभावी वाटत नसला तरी प्रत्येकानं कोविड संदर्भातील खबरदारी घ्यायला हवी. चीनमधील वाढत्या कोरोनाचा भारतातील उत्पादनांच्या आयात-निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. भारतातील चीनी उत्पादनांची विक्री पाहता वाढत्या कोरोनामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com