कोरोनावरील लशीत या कंपनीनी मारली बाजी

पीटीआय
Thursday, 3 December 2020

कोरोना व्हायरसच्या साथीला अटकाव घालण्यासाठी जगभरात लशींवर वेगाने संशोधन सुरू असतानाच ब्रिटनने फायझर- बायोएनटेक कंपनीच्या लशीला बुधवारी मंजुरी दिली आहे. ही लस पुढील आठवड्यापासून सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

लंडन - कोरोना व्हायरसच्या साथीला अटकाव घालण्यासाठी जगभरात लशींवर वेगाने संशोधन सुरू असतानाच ब्रिटनने फायझर- बायोएनटेक कंपनीच्या लशीला बुधवारी मंजुरी दिली आहे. ही लस पुढील आठवड्यापासून सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला पाश्‍चिमात्य देश ठरला आहे. दोन वेळा देता येणाऱ्या लसीचे चार कोटी डोसची मागणी ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेककडे नोंदविली आहे. फायझर ही अमेरिकेची तर बायोएनटेक ही जर्मनीतील कंपनी आहे. कोरोनावरील लशीला मान्यता द्यावी, यासाठी युरोपिय औषधे नियामक विभागाकडे अर्ज केला होता, अशी माहिती या कंपन्यांनी दिली. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने पुढील पाऊल उचलल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. या कंपन्यांनी लशीच्‍या मान्यतेसाठी अमेरिकेत २० नोव्हेंबरला अर्ज केला होता.

अमेरिकेतून गायब झालेला रहस्यमयी खांब दिसला यूरोपात; लोकांमध्ये गोंधळ

लस ९५ टक्के प्रभावी 
‘फायझर- बायोएनटेक’च्या लशीच्या अंतिम चाचण्यांचे परिणाम १८ नोव्हेंबर रोजी आले त्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्यात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे निदर्शनास आले असल्याचा दावा कंपन्यांनी केला होता. सुमारे ४४ हजार स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात आली होती. लस दिल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम आढळले नसल्याचे सांगण्यात आले. कंपनीने ९ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्राथमिक विश्‍लेषणानुसार  कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लस ९० टक्के यशस्वी ठरल्याचे आढळून आले होते. पण त्या वेळी लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. 

रात्री चमकणाऱ्या लाटांचं सत्य काय, "गुलाबी थंडीत रत्नागिरीतील आरे वारे...

भारतासाठी उपयुक्त?
फायझरच्या लसीला ब्रिटनने मान्यता दिल्याच्या घोषणेने मोठा दिलासा मिळाला असला तरी भारतासाठी ही लस उपयुक्त आहे, का याची चाचपणी करणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फायझरच्या लशीला उणे ७० सेल्‍सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान आवश्‍यक आहे. आतापर्यंत लशीसाठीचे हे सर्वांत कमी थंड तापमान आहे. लशीसाठी भारतात आवश्‍यक असलेल्या शीत साखळीच्या गरजेचे महत्त्व व्यक्त करताना विषाणूशास्त्रज्ञ आणि हरियानातील अशोका विद्यापीठातील ‘त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेस’चे डॉ. शाहिद जमील यांनी फायझरच्या लशीची निवड येथे व्यावहारिक नाही किंवा तो पर्यायही नाही, असे स्पष्ट केले आहे. 

चीनच्या आधीच अमेरिकेत पसरू लागला होता कोरोना; अमेरिकेच्याच रिपोर्टचा नवा दावा

कंपन्यांचे दावे
- तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस कार्यक्षम असल्याचे सिद्ध.
 - कोरोनाबाधित १७० रुग्णांना ‘बीएनटी १६२बी२’ लसीचा डोस दिला.
- पहिला डोस दिल्याच्या २८ दिवसांनंतरच ती ९५ टक्के प्रभावी असल्याचे आढळले.
- ६५ वर्षांपेक्षावरील ज्येष्ठांसाठी लस ९४ टक्के प्रभावी.

कोरोनाच्या साथीविरुद्धच्या लढ्यात या लशीला ब्रिटनकडून मिळालेली परवानगी हा ऐतिहासिक क्षण आहे. 
- अल्बर्ट बोउरला, मुख्य कार्यकारी अधिकारी, फायझर  

ही लस साठवण्यासाठी शीतगृहांमध्ये उणे ७० अंश सेल्सिअस एवढे अतिशीत तापमानाची गरज आहे. ही बाब भारतात लशीच्या वितरणात आणि वातानुकूलनाच्या साखळी व्यवस्थेसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
- डॉ. शाहिद जमील, विषाणूशास्त्रज्ञ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: company made a bet on the corona vaccine