सिडनीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ...

coronavirus patients increased in australia
coronavirus patients increased in australia

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना ऑस्ट्रेलियात ही कोरोना विषाणू पसरला आहे. देशात एकूण २४२६ रुग्ण असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे.ऑस्ट्रलियाच्या न्यू साऊथ वॉल (एनएसडब्लू) प्रांतात कोरोनाबाधितांची संख्या १०२९ झाली आहे. व्हिक्टोरिया प्रांतात ४६६ तर क्वीन्सलँड प्रांतात ४४३ कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे.

गेल्या आठवड्यामध्ये २० आणि २१ तारखेला सिडनी मधील बोन्डाय बीच वर ५०० पेक्षा अधिक नागरिक एकत्र आले होते. या गर्दीवरून नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याची टीका होऊ लागली आहे. येथून ८ किमी अंतरावर असणाऱ्या सरक्युलर-की या ठिकाणी २७०० प्रवाशांचे रुबी प्रिन्सेस नावाचे जहाज आले होते.  त्यातील १३ लोकांची कोविड-१९ ची चाचणी घेण्यात आली होती. याचे परिणाम अंधारात असताना संभाव्य विषाणूचा धोका असणारे नागरिक टॅक्सी, रेल्वे, बस, विमानने प्रवास करत होते. सोमवारी (ता. २३) २४ तासांमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत एनएसडब्लू मध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्या १४९ ने वाढली. यामधील अर्ध्याहून अधिक नागरिक हे रुबी प्रिन्सेस जहाजावरील होते. या जहाजेवरील ७७ वर्षीय महिलेचा कोविड -१९ मुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुबी प्रिन्सेस जहाजावरील करोनाबाधितांची संख्या १३० झाली. एनएसडब्ल्यूचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. केरी चांट यांनी सांगितले की, 'एनएसडब्ल्यू हेल्थ या रोगाचा प्रसार करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी कोणतीही कारवाई करू शकली नाही.' ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सचे आयुक्त मायकेल औट्रम यांनी यासाठी एनएसडब्ल्यूकडे बोट दाखवले आहे. अशाप्रकारे सर्व राजकीय अधिकारी एकमेकांवर आरोप करत आहेत.  

'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'

मंगळवारपासून (ता. 24) पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या आदेशानुसार कोरोनाव्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स, पश्चिम ऑस्ट्रेलिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड, नॉर्द्रन टेरिटोरी आणि तास्मानिया राज्यांच्या सीमा अनावश्यक प्रवासासाठी बंद केल्या आहेत. आय टी क्षेत्रामध्ये मध्ये काम करणारे कर्मचारी सध्या घरातून काम करत आहेत. शाळा - महाविद्यालये बंद करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन लोकांनां त्यांचे व्यवसाय बंद ठेवावे लागत आहेत. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सेवा सरकारने मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद केल्यामुळे कामगारांचे रोजगार बंद झाले आहेत. यामुळे सलून, मसाज सेंटर, जिम, स्विमिंग पूल, कसिनो, पब्स, कॅफे, रेस्टॉरंट्स, शॉपिंग सेंटर मधील फूड कोर्ट इ. ठिकाणी काम करणारे सध्या सरकारी कार्यालयांच्या बाहेर रोजगार भत्यासाठी रांगा लावून आहेत. विवाह, अंत्यविधी मध्ये ५ ते १० पेक्षा जास्त लोक नसले पाहिजेत, तसेच बर्थडे पार्टी आणि इतर पार्ट्यांवर बंदी घातली आहे.  

इटलीच्या रस्त्यांवर पडून आहेत शेकडो मृतदेह; जाणून घ्या वास्तव

नागरिक भितीपोटी जीवनावश्यक वस्तूंची भरमसाट खरेदी करून ठेवत आहेत. त्यामुळे वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. भारतीय दुकानांमध्ये खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे भारतीय संकटात सापडले आहे. शिवाय, भारतीय दुकानातील गव्हाचे पीठ, तांदूळ, मसाले यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टॉयलेट पेपर सह इतर जीवनावश्यक वस्तूंचा सुपरमार्केट मध्ये तुटवडा असल्यामुळे नागरिक पहाटे पासून सुपरमार्केट, मॉल्सच्या बाहेर रांगा लावताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com