आम्हाला वटवाघळं चावली; कोरोनावर वुहानच्या शास्त्रज्ञांचा अजब दावा

China
China

वुहान Covid19 News : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोविड-१९ विषाणूचे खापर इतरांवर फोडण्याचे चीनचे प्रयत्न कायम आहेत. वुहानमध्ये पहिला रुग्ण आढळला म्हणजे विषाणूचे उगमस्थान ते होय असे नाही असाही दावा करण्यात आला होता. आता मात्र तेथील शास्त्रज्ञांनी कमाल केली आहे. नमुने घेताना आम्हाला वटवाघळे चावली, जी बाधित असावीत, असे ते सांगत आहेत. हे शास्त्रज्ञ वुहानमधील त्याच प्रयोगशाळेचे आहेत, जेथे कोविड-१९ विषाणूचा उगम आणि जागतिक साथीचा प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. 

शास्त्रज्ञांबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ २०१७चा आहे, जो आता व्हायरल केला जात आहे. SARS-Cov-२ किंवा कोविड-१९ विषाणूचा उगम २०१९च्या अखेरीस झाल्याचे मानले जाते. जगातील अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. मेल ऑनलाईनमधील वृत्तानुसार एका शास्त्रज्ञाने गुहेत नमुने गोळा करताना रबरी हातमोज्यांमधून एका प्राण्याचे दात सुईप्रमाणे आत घुसल्याचा दावा केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तैवान टाईम्सने म्हटले आहे की, व्हिडिओत एका शास्त्रज्ञाने उघड्या हातांनी वटवाघुळ धरल्याचे दिसते. एका व्यक्तीच्या अंगावरील सूजही दाखविण्यात आली आहे. वटवाघळात अनेक घातक विषाणू असतात असे व्हिडिओतील निवेदक सांगतो.

सन टीव्हीनुसार हे चित्रीकरण चीनमधील एका टीव्ही कंपनीच्या पथकाने केले आणि ते २०१७ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. हा व्हिडिओ ऑनलाइन उपलब्ध नाही. त्यावरील लोगोनुसार हे चित्रीकरण सीसीटीव्ही-१३ म्हणजे चायना सेंट्रल टेलिव्हीजन या चीनमधील सर्वांत मोठ्या वाहिनीच्या वृत्तवाहिनीने केल्याचे सूचित होते.

प्राण्यांमधून माणसात...
या व्हिडिओतील माहितीवरून ती प्रकारच्या शक्यता पुढे येत आहेत. वटवाघुळ चावल्यामुळे प्राण्यांमधून माणसात विषाणू शिरला असावा. हीच तशी पहिली वेळ असावी आणि तो विषाणू म्हणजेच आताचा कोविड-१९ असू शकतो.

पीपीई किट न घालता..
या व्हिडिओनुसार वुहान विषाणूशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ जिवंत विषाणूंबातचे काम पीपीई कीट न घालता करीत आहेत. वास्तविक जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) सुरक्षेच्या नियमांचा हा भंग आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com