बाबो! पृथ्वी विकत मिळणार! कितीला असेल बरं जाणून घ्या|Know The Price Of Earth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

human can buy entire planet
बाबो! पृथ्वी विकत मिळणार! कितीला असेल बरं जाणून घ्या|Know The Price Of Earth

बाबो! पृथ्वी विकत मिळणार! कितीला असेल बरं जाणून घ्या

आजकाल लोकं मालमत्ता विकत घेऊन आपले भविष्य सुरक्षित करता. काही लोकं घर खरेदी करतात. काहीजण जमीन (Land) तर कोणी सोने. पण तुम्ही आता संपूर्ण पृथ्वी (Earth) विकत घेऊ शकता असं कोणी तुम्हाला सांगितलं तर! होय. हे खरं आहे. इच्छा असल्यास आता तुम्ही आता पृथ्वीचे मालकही होऊ शकता. पृथ्वी विकत घेण्याची किंमत (Price Of Earth) किती असेल याचा अंदाज लावण्यात आला आहे. जर तुमच्याकडे तितके पैसे (Money) असतील तर तुम्ही संपूर्ण पृथ्वी विकत घेऊ शकता. पण त्याआधी त्याची किंमत तर जाणून घ्या.

हेही वाचा: अजबच! मासिक पाळीचं रक्त त्वचेवर लावते, म्हणे आरोग्यासाठी हितकारक

2022सालानुसार Treehugger.com ने नुकतेच पृथ्वीचे मूल्य मोजले आहे. पृथ्वी, जमीन, नदी, खनिजे आणि प्रत्येक गोष्टीची किंमत 3,76,25,80,00,00,00,00,060 रुपये (3 लाख 76 हजार 258 ट्रिलियन) इतकी आहे. जर तुमच्याकडे इतके पैसे असतील तर तुम्ही संपूर्ण पृथ्वी विकत घेऊ शकता. एवढी मोठी रक्कम मोजायला काही महिने लागतील. मशीनच्या मदतीने मोजायचे असतील तर त्यासाठी खूप दिवस लागतील. शिवाय त्यासाठी अनेक मशिन्सही लागतील.

हेही वाचा: उत्तर कोरियाच्या पुन्हा एकदा जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणीने खळबळ

अशी ठरवली किंमत

या किमतीमुळे पृथ्वी संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात महाग ग्रह झाली आहे. पण, पृथ्वीचे हे मूल्य कसे मोजले गेले असा विचार तुमच्या मनात आला असेल? कॅलिफोर्नियाच्या सरसल विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक ग्रेग लॉफलिन यांनी हे मूल्य एका विशेष सूत्रासह लागू केले आहे. पण, ही गणना खूपच कमी वैज्ञानिक आहे. तसेच यामध्ये पृथ्वीचा आकार, वस्तुमान, तापमान, वय आणि इतर अनेक घटक लक्षात घेऊन गणित जोडण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी केवळ पृथ्वीच नव्हे, तर सूर्यमालेतील अनेक ग्रहांची किंमत मोजली आहे.

हेही वाचा: रशिया आणि अमेरिका संघर्षाच्या उंबरठ्यावर?

सौर यंत्रणेतील सर्वात महाग ग्रह

ग्रेगने योग्य हिशेब करून त्याआधारे या किंमती ठरवल्या आहेत. त्याने मंगळाची किंमत फक्त १२ लाख २ हजार रुपये ठेवली आहे. तर, शुक्राची किंमत स्वस्त आहे. ग्रेगच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी कोणीही विकत घेऊ शकत नाही. पण त्यावर अंदाजे किंमत लावण्यामागे एक मोठे कारण आहे. ग्रेगच्या मते, लोकांना माहित असले पाहिजे की ते किती मौल्यवान ग्रहावर म्हणजेच पृथ्वीवर राहतात. त्यात फुकटात जगण्याची संधी मिळाली तर त्याचे मोल करायला हवे. त्यानुसार काळजी घ्यायला हवी.

Web Title: Do You Know The Price Of Earth Human Can Buy Entire Planet In How Much Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..