
डॉक्टर निघाला 94 मुलांचा 'बाप', रुग्णांमध्ये स्वत:चे स्पर्म टाकायचा
अनेक डॉक्टर त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे चर्चेत येत असतात मात्र इनडियनॅपलिसमध्ये एका फर्टिलिटी सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तेथील एक डॉक्टर एक नाही तर चक्क 94 मुलांचा बाप निघाला. तुम्हाला वाटत असेल हा काय प्रकार आहे, पण हे खरंय. या डॉक्टरचे नाव डॉ डोनाल्ड क्लाइन (Donald Cline) आहे. (A doctor has become father of 94 children by impregnating his own sperm with his patients)
नुकतीच नेटफ्लिक्सवर अवर फादर नावाची (Our Father) एक डॉक्युमेंटरी आली आहेय यात डॉ डोनाल्ड क्लाइनची खरी कहाणी उघडकीस आणली आहे.1970 आणि 1980 च्या दशकातील ही घटना आहे.
हेही वाचा: चंद्राच्या मातीत बिजाला फुटले अंकुर
डॉ डोनाल्ड क्लाइन त्याच्या रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये तो आपले स्पर्म टाकत असे. बेशुद्ध केल्यानंतर महिला रुग्णांना न सांगता तो हे काम करायचा. आश्चर्याची बाब म्हणजे ही डॉक्युमेंट्री त्याच्याच मुलीने तयार केली असून तीने हे प्रकरण उघडकीस आणले. जेकोबा बेलाद असं डॉक्टरच्या मुलीचं नाव आहे.
हेही वाचा: उत्तर कोरियात कोरोना वाढला; हुकुमशहा किम जोंग उन आक्रमक
जेकोबा बेलाद म्हणतात की याविषयी मला फारशी कल्पनाही नव्हती. उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी हे काम केल्याची घटना अनेक वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी त्याच्याकडून केवळ 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता पण आता त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले.
Web Title: Doctor Has Become Father Of 94 Children By Impregnating His Own Sperm With His Patients
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..