आणीबाणी तत्काळ मागे घ्या; युरोपीय महासंघाचे लष्करी राजवटीला आवाहन

बॅकॉंक: म्यानमार येथील लष्करी राजवटीच्या विरोधात सोमवारी थायलंड येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयासमोर म्यानमारच्या नागरिकांनी आंदोलन केले.
बॅकॉंक: म्यानमार येथील लष्करी राजवटीच्या विरोधात सोमवारी थायलंड येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयासमोर म्यानमारच्या नागरिकांनी आंदोलन केले.

यांगून/ब्रुसेल्स - म्यानमारमधील लष्करीशाहीविरोधात नागरिकांनी उभारलेल्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असून ठोस कारवाई करण्याचा विचार युरोपीय महासंघ करत आहे. ‘ईयू’च्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. म्यानमारमध्ये लागू असलेली आणीबाणी मागे घेण्याचे आवाहनही  या वेळी ‘ईयू’ने केले. 

म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या हाती पुन्हा सत्ता सोपवावी आणि नव्या संसदेचे कामकाज सुरु करावे, अशी मागणीही युरोपीय महासंघाने केली आहे. लष्करी राजवटीला विरोध म्हणून म्यानमारच्या काही लष्करी नेत्यांवर निर्बंध घालण्याचाही त्यांचा विचार आहे. यामुळे म्यानमारमधील काही लष्करी अधिकाऱ्यांची युरोपातील संपत्ती गोठवली जाण्याची शक्यता असून त्यांना युरोपात प्रवेशबंदीही केली जाऊ शकते. म्यानमारमध्ये आंदोलन सुरु असून आतापर्यंत ६४० जणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या दडपशाहीत तीन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंदोलकांविरोधात बळाचा वापर करण्याच्या सुरक्षा रक्षकांच्या कृतीचाही युरोपीय महासंघाने निषेध केला आहे. दरम्यान, आंदोलकांविरोधात शस्त्रबळाचा वापर करण्याचा इशारा म्यानमारमधील लष्करी राजवटीने देऊनही आज यांगून, मंडाले आणि इतर काही शहरांमध्ये लष्कराविरोधात निदर्शने झाली.

मानवाधिकार आयोगाची बैठकीत चर्चा
जीनिव्हा : म्यानमारमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत म्यानमारबरोबरच रशियात अलेक्सी नवाल्नी यांना झालेली अटक, इथिओपिया आणि श्रीलंकेतील मानवाधिकार भंगाच्या घटना यावरही चर्चा होणार आहे. चार आठवडे चालणाऱ्या या बैठकीत विविध देशांचे अध्यक्ष आणि पंतप्रधान बोलणार आहेत.

आधुनिक जगात लष्करी बंडाला कोणतेही स्थान नाही. म्यानमारमधील दडपशाही ताबडतोब थांबवावी.
- अँटोनिओ गुटेरेस, सरचिटणीस, यूएन

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com