Covid Throat Infection : कोरोनाची लागण झाल्यामुळे लहान मुलीचा गेला आवाज; समोर आलं पहिलं प्रकरण

या मुलीला आधी दम्याची लागण झाली होती. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येणं हे त्याचं लक्षण समजलं जात होतं. मात्र, हे कोरोनामुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Covid-19 Vocal Infection
Covid-19 Vocal InfectioneSakal

Covid-19 Vocal Cord Paralysis : कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशाची खवखव होत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत होती. आता अमेरिकेत असंच एक प्रकरण समोर आलं आहे. कोविड-19 मुळे एका 15 वर्षांच्या मुलीचा आवाज गेला आहे.

अमेरिकेतील एका रुग्णालयात 13 दिवसांपूर्वी या तरुणीला दाखल करण्यात आलं होतं. तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं, तसंच तिला श्वास घेण्यातही अडचण येत होती. यानंतर हळू-हळू तिचा आवाज गेला. एंडोस्कोपिक चाचणीत असं दिसून आलं की तिला बायलॅटरल व्होकल पॅरालिसिस (Vocal Cord Paralysis) झाला आहे.

मासाचुसेट्स आय अँड इअर हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबत अधिक रिसर्च (US Covid-19 Research) केला. यामध्ये हे पॅरालिसिस अन्य आजारामुळे नाही, तर कोरोनामुळेच झाल्याचा निष्कर्ष समोर आला. पीडियाट्रिक्स नियतकालिकामध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. दि हिंदूने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Covid-19 Vocal Infection
Corona JN.1 Virus : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर जुनीच लस येईल कामी; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

"लहान मुलांमध्ये कोरोनाचा (Covid in Children) प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. अशा वेळी, या नव्या लक्षणांकडे अधिक काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. या मुलीला आधी दम्याची लागण झाली होती. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येणं हे त्याचं लक्षण समजलं जात होतं. मात्र, हे कोरोनामुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशाच प्रकारचा गैरसमज इतर रुग्णांच्या बाबतीत देखील होऊ शकतो. त्यामुळे विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे." असं मत या संशोधनाचे मुख्य ऑथर डॅनियल लॅरो यांनी व्यक्त केलं.

या मुलीवर उपचारांसाठी सुरुवातीला स्पीच थेरपीची मदत घेण्यात आली. मात्र, तरीही तिचा आवाज परत आला नाही. यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन विंडपाईपमध्ये छिद्र करण्यात आले, ज्यामुळे तिला पुन्हा पहिल्याप्रमाणे श्वास घेता योऊ लागला. सुमारे 15 महिने तिच्यावर उपचार सुरू होते.

Covid-19 Vocal Infection
JN.1 Covid 19 variant: JN.1 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आढळत आहेत 'ही' लक्षणे; तात्काळ करा डॉक्टरांना संपर्क

"कोरोनामुळे लहान मुलांमध्ये लाँग-टर्म न्यूरोट्रोफिक परिणाम होऊ शकतात हे डॉक्टरांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सर्वांनी उपचार करताना खबरदारी घ्यावी" असं मत या संशोधनाचे दुसरे लेखक ख्रिस्तोफर हार्टनिक यांनी व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com