esakal | Video: मंत्र्याने हातानेच झाकलं तोंड...
sakal

बोलून बातमी शोधा

french minister panic after she forgets mask video viral

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाला उपस्थित राहिलेली मंत्री मास्क घालायला विसरल्यामुळे त्यांना चक्क हातानेच तोंड झाकण्याची वेळ आली. काही वेळातच त्यांना मास्क मिळाला. पण, हाताने तोंड झाकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: मंत्र्याने हातानेच झाकलं तोंड...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रोम : फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाला उपस्थित राहिलेली मंत्री मास्क घालायला विसरल्यामुळे त्यांना चक्क हातानेच तोंड झाकण्याची वेळ आली. काही वेळातच त्यांना मास्क मिळाला. पण, हाताने तोंड झाकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

...म्हणून डॉक्टरने घातले एकावर एक सहा मास्क!

फ्रान्समध्ये घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक आहे. 14 जुलैला पॅरिसमध्ये झालेल्या बॅस्टिल डे च्या कार्यक्रमाला फ्रान्सच्या उद्योगमंत्री एग्नेस पॅन्नियर रनर उपस्थित होत्या. फ्रान्सच्या या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्याला त्या मोटारीने पोहोचल्यानंतर अधिकाऱयांना भेटू लागल्या. पण, काही वेळातच आपण मास्क विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी हाताने तोंड झाकले. आपल्या गाडीच्या दिशेने धावू लागल्या. उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना इशाऱ्याने मास्कबाबत सांगितले. तोपर्यंत त्या तोंडावर हात ठेवून राहिल्या. काही वेळातच अधिकाऱ्याने त्यांना मास्क आणून दिला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

दरम्यान, जगभरात 13,732,432 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 587,790 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर, ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सचा अठरावा नंबर आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 173,304 कोरोना रुग्ण आहेत. 30,120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याची घोषणा केली आहे.

Video: बैलाला प्रेम सहन झालं नाही मग त्याने...