Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

Missile Strike Little India Israel : हल्ल्यात किमान १०० जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. १२ वर्षांचा मुलगा स्फोटातील तुकड्यांमुळे गंभीर जखमी झाला.अनेक जणांना किरकोळ दुखापती धावताना पडल्यामुळे किंवा स्फोटामुळे झाल्या.
Missile strike aftermath in Dimona, Israel’s “Little India,” where over 100 people were injured following an Iran attack.

Missile strike aftermath in Dimona, Israel’s “Little India,” where over 100 people were injured following an Iran attack.

esakal

Updated on

इराणने शनिवारी रात्री दक्षिण इस्त्रायलमधील मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिमोनो शहराजवळ हल्ला केला. यात किमान १०० लोक जखमी झाले. दिमोना हे त्याच्या अणुभट्टीच्या घुमटाकार रचनेसाठी प्रसिद्ध आहे; ते 'लिटल इंडिया' म्हणूनही ओळखले जाते. मागेन डेव्हिड अडोम (MDA) बचाव सेवा आणि स्थानिक रहिवाशांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, जखमींमध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, जो स्फोटातून उडालेल्या तुकड्यांमुळे गंभीर जखमी झाला आहे. इराणसोबत अमेरिका-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक आहे.

Missile strike aftermath in Dimona, Israel’s “Little India,” where over 100 people were injured following an Iran attack.
Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com