इव्हान्का ट्रम्प पडली मीम्सच्या प्रेमात; भारतीयांच्या कल्पकतेला दिली दाद!

टीम ई-सकाळ
सोमवार, 2 मार्च 2020

२०१७ मध्ये इव्हान्का हैदराबाद येथे झालेल्या विश्व शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पहिल्यांदा भारतात आली होती. त्यानंतर ती आता दुसऱ्यांदा भारतात आली होती.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या आठवड्यात दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इव्हान्का ट्रम्प आणि अमेरिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

ट्रम्प यांची मुलगी इव्हान्काला जगातील सात प्रमुख आश्चर्यांपैकी एक असलेला आणि भारताच्या जिरेटोपातील मानाचा तुरा असलेला ताजमहाल खूप आवडला. तेथे तिने भरपूर फोटोही काढून घेतले. त्यावर खूप मिम्स व्हायरल झाले असून त्या मीम्सच्या प्रेमात इव्हान्काही पडल्याचे दिसून आले. स्वत: इव्हान्कानेच आपल्या ट्विटर अकाउंटवरून हे मीम्स शेअर केले आहेत. 

- ब्रिटनचे पंतप्रधान तिसऱ्यांदा बोहल्यावर; नवरी आहे प्रेग्नंट!

फोटोशॉपच्या आधारे तयार केलेले मीम्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच आलेल्या गुड न्यूज या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकलेला पंजाबी अभिनेता दलजीत दोसांझनेही इव्हान्कासोबतचा एक फोटो ट्विट केला होता. तो इतका व्हायरल झाला की स्वत: इव्हान्कानेही दलजीत सोबतचा हा फोटो रिट्विट केला. आणि दलजीतला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. 

दलजीतने फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ''मी आणि इव्हान्का, ताजमहाल दाखव म्हणून इव्हान्का मागेच लागली होती. मग तिला घेऊन आलो आणि दाखवला ताजमहाल.'' 

- ट्रम्प भाषण देताना नेहमी अडखळतात; नेमकं काय आहे कारण?

याला उत्तर देत इव्हान्कानेही म्हटले आहे की, ''इतका सुंदर ताजमहाल दाखवल्याबद्दल दलजीत तुझे खूप धन्यवाद. मी कधीही विसरू शकणार नाही, असाच हा अनुभव होता.''

दुसऱ्या एका ट्विटला उत्तर देताना इव्हान्का म्हणाली की, ''भारतीयांच्या कल्पनाशक्तीला मी सलाम करते. मी भारतात खूप नवीन मित्र जोडले.'' 

- अमेरिकेचा तालिबानशी काय झाला ऐतिहासिक करार

२०१७ मध्ये इव्हान्का हैदराबाद येथे झालेल्या विश्व शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पहिल्यांदा भारतात आली होती. त्यानंतर ती आता दुसऱ्यांदा भारतात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ivanka Trump reply to photoshopped meme breaks internet today