कोरोनाचा व्हायरस पसरतोय 'सीफूड मार्केट'मधून!

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जानेवारी 2020

या प्रकारातील विषाणूंची लागण डिसेंबर 2019 मध्येही अनेकांना झाली होती. त्या काळात वुहान प्रांतातील वटवाघुळे ही दीर्घ निद्रेत गेलेली होती.

बीजिंग : चीनमध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना हा विषाणू जरी वटवाघुळांमार्फत मानवांमध्ये प्रसारीत झाला असला तरी हा विषाणू वुहान येथील सीफूड मार्केटमधील विकल्या गेलेल्या इतर प्राण्यांमधूनही पसरला गेल्याची शक्‍यता 'द लान्सेट' या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या लेखातून वर्तवण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्य चीनच्या वुहानमधील नऊ रुग्णांकडून कोरोना विषाणूच्या 10 जनुकांच्या विश्‍लेषणामध्ये असे आढळले आहे की, हा विषाणू वटवाघुळांमधून पसरलेल्या 'सार्स' या विषाणूंप्रमाणेच असल्याचे समोर आले आहे.

- Delhi Election 2020 : 'भारतीय मुस्लिमांना देशाबाहेर काढणे तर...'; राजनाथ सिंहांचे मोठे वक्तव्य

चीनमधील शेडोंग वैद्यकीय विज्ञान अकादमीमधील संशोधकांनी असे म्हटले आहे, की त्यांच्या विश्‍लेषणावरून वटवाघूळ हेच या विषाणूचे मूळ असू शकतात. मात्र, वुहानच्या सीफूड मार्केटमधील मृत प्राण्यांमार्फतदेखील हा विषाणू पसरला जाण्याची शक्‍यता त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे.

- #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!

या प्रकारातील विषाणूंची लागण डिसेंबर 2019 मध्येही अनेकांना झाली होती. त्या काळात वुहान प्रांतातील वटवाघुळे ही दीर्घ निद्रेत गेलेली होती. त्यामुळे त्या वेळी बाजारात वटवाघूळ विक्रीला नव्हती. त्यामुळे या विषाणूंचा प्रसार वटवाघुळांशिवाय वुहानमधील सीफूड मार्केटमधील इतर प्राण्यांमधून पसरल्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले आहे.

- Video : पंतप्रधानांचं हास्य घायाळ करणारं; महिला मंत्री पंतप्रधानांवर फिदा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lancet Journal reports that coronavirus is spreading through the seafood market