पाकिस्तानमध्ये चर्चा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची

uddhav yogi
uddhav yogi

लाहोर, ता. 8 ः "डॉन' या पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्राने कोरोनाविरोधी लढ्याच्यासंदर्भात भारतामधील दोन राज्यांशी तुलना केली आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले आहे, तर महाराष्ट्रावर टीका केली आहे.  "डॉन'चे संपादक फहाद हुसेन यांनी दोन ट्विट केली आहेत. यात त्यांनी एक नकाशाही पोस्ट केला आहे आहे. 

हुसेन यांनी म्हटले आहे की, "पाकपेक्षा लोकसंख्या जास्त (22 कोटी 50 लाख- 20 कोटी 80 लाख) असूनही मृत्यूदर कमी असल्यामुळे उत्तर प्रदेशने नेमके काय बरोबर केले हे जाणून घेतलेच पाहिजे. पाकमधील मृत्यूदर जवळपास सात पट जास्त आहे. दोन्ही ठिकाणचे स्वरूप व साक्षरता जवळपास सारखीच आहे. पाकमध्ये लोकसंख्येची घनता कमी, तर एकूण देशांतर्गत उत्पन्न जास्त आहे. उत्तर प्रदेशने लॉकडाउन कडक पाळले, तर आपण नाही. त्यामुळेच हा फरक राहिला.' 

दुसऱ्या ट्‌विटमध्ये हुसेन म्हणतात की, "भारताच्या पश्‍चिमेतील महाराष्ट्राची कामगिरी पाकच्या तुलनेत धक्कादायक आहे. तेथील मृत्यूदर जास्त आहे. यावरून अयोग्य निर्णय आणि त्याचे घातक दुष्परिणाम स्पष्ट होतात. तेथील लोकसंख्या तरुण असून एकूण देशांतर्गत उत्त्पन्न जास्त आहे. अशावेळी उत्तर प्रदेशने काय योग्य व महाराष्ट्राने काय चुकीचे केले हे समजून घेत आपण योग्य धडे गिरविलेच पाहिजेत.' 

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी नव्या 2553 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 109 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 88528 जणांना कोरोनाची लागण झाली असून 3169 जणांचा मृत्यू झाला आहे.  दिलासा देणारी गोष्ट म्हणजे दिवसभरात 1661 कोरोनाचे रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले तर आतापर्यंत 40975 लोक बरे झाले आहेत.

भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे केवळ 17.23 रुग्णसंख्या असून एक लाख लोकांमागे मृत्यूचे प्रमाण फक्त 0.49 टक्के म्हणजे अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी आहे. शिवाय, कोरोना रोखण्यासाठी भारताने पुढाकार घेऊन केलेल्या उपाययोजनांची जनतेने, जागतिक आरोग्य संघटनेने आणि जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनीही प्रशंसा केली असल्याचाही सरकारचा दावा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com