
प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्याने आयुष्याचे शंभर वर्ष जगावे. प्रत्येकजण आपला शंभरावा वाढदिवस आपल्या कुटूंबासोबत साजरा करण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यातही वयाचे शंभर वर्ष जगणारे आणि आपला वाढदिवस साजरा करणारे लोक खुपच कमी मिळतील.
अशाच एक आजी आपला 100 वा वाढदिवस साजरा करत होत्या पण अचानक पोलिसांनी त्यांना थेट वाढदिवशीच बेड्या ठोकल्या आणि आजीला शंभराव्या वाढदिवशी पोलिसांनी अटक केली. (Police arrested a old woman on her 100th birthday in australia)
तुम्हाला वाटेल आजीने असं काय केलं की थेट त्यांना त्यांच्या १०० व्या वाढदिवशीच पोलिसांनी अटक केली? खरं तर यामागील कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल. पण सध्या या आजीबाई त्यांच्या अटकेमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत.
खरंतर आपल्याला अटक व्हावी अशी या आजीबाईची इच्छा होती. १०० वर्षात त्यांना कधीही अटक झाली नाही. त्यांची ही इच्छा आजीबाईंच्या कुटूंबाने पुर्ण केली. कुटुंबाने पोलिसांना बोलावलं आणि तिला अटक करायला लावलं. जीन बिकेटन असं या आजीचं नाव असून त्या ऑस्ट्रेलियात राहतात.
आजीबाई वाढदिवस साजरा करत असताना अचानक पोलिस आले आणि आजीबाईला अटक केली. आजीबाईंची इच्छा तिच्या शंभराव्या वाढदिवशी पुर्ण करण्यात आली. त्यानंतर आजीबाईंची पोलिसांनी सुटका केली आणि आजीबाईंनी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला.
सध्या ही आजी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.