युक्रेनमध्ये तरुणींची बलात्कार करुन हत्या; रशियन सैन्यांवर गंभीर आरोप | Russia Ukraine War | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russian soldiers

युक्रेनमध्ये तरुणींची बलात्कार करुन हत्या; रशियन सैन्यावर गंभीर आरोप

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या ४० दिवसापासून युद्ध सुरु आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिक तीव्र होताना दिसतेय.या युद्धामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातच एक खळबळजनक बाब समोर आली आहे. युक्रेनमधील अनेक निष्पाप तरुणींवर आणि अल्पवयीन मुलींवर रशियन सैनिकांनी बलात्कार केल्याचा दावा केला जातोय.यातच आता रशियन सैनिकांनी एका १० वर्षांच्या मुलींवर बलात्कार करून त्यांच्या शरीरावर स्वस्तिकसारखं चिन्ह काढल्याचा दावा युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेंक यांनी केला.या संदर्भात त्यांनी ट्विट केले. (russian soldiers loot rape and kill 10 years old girls)

हेही वाचा: किम जोंग उनची बहिण भावासारखीच.. दक्षिण कोरियाला दिली अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी

रशियन सैनिक तरुणींवर बलात्कार करतात, एवढंच काय तर या तरुणींच्या हत्या करण्यात आल्या आहेत, त्यांच्या शरीरावर स्वस्तिकच्या आकाराच्या भाजल्याच्या खुणा दिसून आल्याचं वासिलेंक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: रशियाकडून मानवतेला काळीमा; युक्रेनच्या जनतेवरील अत्याचारांनंतर जगभरातून टीका

या ट्वीटनंतर रशियावर तीव्र टीका होत आहे. रशिया जाणूनबुजून युक्रेनियन लोकांची हत्या करत असल्याचे बोलले जात आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी कीव्हच्या जवळपास ४१० नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कीव्ह शहर रशियन सैन्यानं ताब्यात घेतलं होतं. रशियाच्या वाढत्या हिंसेने युक्रेनियन अधिक आक्रमक झाले.

हेही वाचा: कॅबिनेटच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत नव्या मंत्र्यांना शपथ

रशियाच्या या हिंसेचा विरोध संपुर्ण जगातून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर रशियावर आणखी निर्बंध घालण्याची भूमिका पश्चिमेकडील देशांनी घेतली असून तसं आवाहन करण्यात आलं आहे. युरोपियन युनियननं रशियाकडून होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर निर्बंध लादावेत, असा सल्ला जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे.

Web Title: Russian Soldiers Loot Rape And Kill 10 Year Old Girls

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..