सॅमसंगचे चेअरमन ली कुन-ही यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

lee kun hee samsung.jpg
lee kun hee samsung.jpg

सियोल- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे रविवारी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. कंपनीने ली कुन-ही यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे 25 ऑक्टोबर रोजी निधन झाल्याचे वृत्त सांगताना आम्हाली खूप दुःख होत आहे. सॅमसंगला जगातील सर्वश्रेष्ठ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीपैकी एक बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचा वारसा सदैव राहील, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

ली यांना 2014 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पूत्र आणि कंपनीचे उपाध्यक्ष ली जाय-योंग यांनी कंपनीचा कारभार पाहिला. ली यांना 2017 मध्ये लाच दिल्याबद्दल आणि माजी राष्ट्राध्यक्ष पार्क-ज्यून-ह्ये यांच्याशी निगडीत एका गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना पाच वर्षांची शिक्षाही सुनावली होती. एक वर्षांनंतर त्यांना मुक्त करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com