दक्षिण कोरियाचा रशियाला दणका, SAMSUNGचा मोठा निर्णय

सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमची प्राथमिकता असल्याचे सॅमसंगनी म्हटले आहे.
SAMSUNG
SAMSUNGटिम ई सकाळ

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने संपुर्ण राष्ट्र चिंतेत दिसत आहे. रशियाच्या आक्रमकतेचा संपुर्ण जगातुन विरोध केला जातोय. मात्र रशिया दिवसेंदिवस युक्रेनवर अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. याचा फटका आता रशियाला बसण्यास सुरवात झाली आहे.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगनी रशियाला प्रोडक्टची सेवा देणे बंद केले आहे. Apple, Microsoft या मोठ्या कंपन्यांनी रशियाला सेवा देण्यास नकार दिला आहे. याच यादीत भर म्हणुन आता सॅमसंगही रशियाला सेवा पुरवणार नाही. (Samsung Suspends Shipments of Phones, Chips to Russia)

ब्लूमबर्गला ईमेल केलेल्या निवेदनात सॅमसंगने सांगितले की रशियात सॅमसंगच्या सर्व उत्पादनांची निर्यात निलंबित करण्यात आली आहे.आमची संवेदना या युद्धाला सामोरे जाणाऱ्या प्रत्येकासोबत आहे.आमचे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमची प्राथमिकता आहे. या सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सॅमसंगनी स्पष्ट केले.

SAMSUNG
Russia Ukraine War Live : युक्रेनच्या मारियुपोल शहराची रशियन सैन्याकडून नाकेबंदी

युक्रेनच्या अणुऊर्जा सेंटरवर रशियन सैन्याने हल्ला केल्याचे युक्रेनन सांगितले आणि त्यानंतर शुक्रवारी तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी रशियाचा युक्रेनवरील अन्यायकारक आणि बेकायदेशीर आक्रमणाचा निषेध केला आणि रशियामधील सेवांची सर्व नवीन विक्री निलंबित केली. Apple ने सुद्धा रशियात iPhones ची विक्री थांबवली आहे त्याचप्रमाणे या शिवाय रशियामधील इतर लोकप्रिय उत्पादनांवरही निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com