दक्षिण कोरियात 24 तासांत कोरोनाचे तब्बल 4 लाख नवे रुग्ण

ओमीक्राॅन व्हेरियंटमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
South Korea
South Korea
Summary

जगातील काही देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काही ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

सियोल : जगातील काही देशांमध्ये कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही देश असेही आहेत जिथे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आता चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. दोन दिवसांपूर्वी चीनमध्ये आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. चीनला पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा पडला असून तिथे काही प्रांतात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. आता चीनचा शेजारी देश असलेल्या दक्षिण कोरियातसुद्धा मोठ्या प्रमाणावर एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ४ लाख नवे रूग्ण आढळले आहेत.

सध्या दक्षिण कोरियामध्ये अध्यक्षीय निवडणूक सुरु होत्या. त्यामुळे कोरियातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं म्हटले जात आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत ७६ लाख २९ हजार २७५ इतके रुग्ण आढळून आले आहेत.

South Korea
Climate Change : UN ने स्वीकारला सायकलला प्रोत्साहन देण्याचा ठराव

कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (KDCA)संस्थेच्या माहीतीनुसार मागील काही दिवसात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात पहिल्यांदा रुग्णसंख्या ४ लाखाने वाढलीय. सिन्हूआ या न्यूज एजन्सीच्या माहीतीनुसार ओमीक्राॅन व्हेरियंटमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं म्हंटलय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com