डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे शत्रू; बायडेन-हॅरिस समर्थक भारतीय समुदायाचा आरोप

trump is enemy of india
trump is enemy of india

वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हे भारत-अमेरिकी समुदायाला चांगल्या रितीने समजून घेतात तर दुसरीकडे रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे शत्रू असून जागतिक व्यासपीठावरून भारतावर नेहमी टीका करतात, असे ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस समर्थकांनी मत मांडले आहे. सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक अजय जैन भुटोरिया म्हणाले की, मित्र आणि शत्रू कोण, हे भारत-अमेरिकी समुदायाला चांगले ठाउक आहे.

अजय भुटोरिया म्हणाले, की ज्यो बायडेन यांनी अमेरिकी सिनेटर आणि उपाध्यक्ष म्हणून काम करताना भारतीय समुदायाला नेहमीच मदत केली आहे. ट्रम्प यांचा चार वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर भविष्यात आमच्याप्रमाणे नातवंडांना, पतवंडांना संधी मिळतील, असे वाटत नाही. समुदायाच्या भावना जाणून घेणारा, समजून घेणारा, मुल्यांची जाण असणारा, सन्मान करणाऱ्या नेत्याची गरज आहे. आमच्या कष्टाचे कौतुक करणारा, प्रशासनात समान संधी देणारा आणि आमचे म्हणणे ऐकूण घेणारा नेता समुदायाला हवा आहे, अशी अपेक्षा भुटोरिया यांनी व्यक्त केली. कालच्या ट्रम्प आणि बायडेन यांच्या तिसऱ्या वादविवादाचा उल्लेख करत भुटोरिया म्हणाले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यासपीठावर भारतावर टीका केली आहे.

भारताचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समुदायाला चांगले ठाउक आहे. ट्रम्प हे शत्रू आहेत. ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान भारताची अकारण बदनामी केली. भारताकडून सांगण्यात येणाऱ्या कोरोनाबाधित संख्येवर विश्‍वास नाही, भारताकडून प्रदूषणाला हातभार लावला जात आहे, अशा शब्दात भारतावर आरोप केले. एवढेच नाही तर एच-१ व्हिसा निलंबित केला आहे आणि भारताबरोबरचे व्यापारी करार अडचणीत आणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरची मैत्री केवळ फोटो काढण्यापुरतीच आणि मिळालेल्या संधीचा फायदा उचलण्यासाठी ठेवली आहे, अशी टीका भुटोरिया यांनी केली.

बायडेन-हॅरिस यांचे भारतीय समुदायाशी घनिष्ट नाते
भुटोरिया म्हणाले, की बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडेन यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. बायडेन आणि हॅरिस यांचे भारत-अमेरिकेशी घनिष्ट नाते आहे. कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीचे सदस्य ॲश कालरा म्हणाले की, गेल्या दोन दशकांपासून हॅरिस आणि त्यांची बहिण माया यांना चांगली ओळखून आहोत. कमला हॅरिस यांना भारतीय परंपरेचा अभिमान आहे. उद्योजक अशोक भट्ट म्हणाले की, ओबामा-बायडेन यांच्या प्रशासनाने भारताला प्राधान्य दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com