esakal | 'बायडेन यांचे हात रक्ताने माखलेले'; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

Biden-Erdogan

इस्रायलने गाझा स्थित काही वृत्तसंस्थांच्या इमारतीला लक्ष्य केल्याने अमेरिकेवरील दबाव वाढला आहे. वृत्तसंस्थांच्या इमारतीवरील हल्ल्याला बायडेन प्रशासनाने मोठी चूक मानली.

'बायडेन यांचे हात रक्ताने माखलेले'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अंकारा : इस्त्राईल (Israel) आणि पॅलेस्टाईनमधील (Palestine) हिंसाचार कायम आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कीचे (Turkey) राष्ट्राध्यक्ष रेचप तैय्यप एर्दोगान (Recep Tayyip Erdogan) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रायलबरोबर बायडेन यांचेही हात रक्ताने भिजले आहेत. इस्त्रायलविरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून एर्दोगान करत आहेत. सध्याच्या संघर्षाबद्दल त्यांनी थेट अमेरिका आणि ऑस्ट्रियावर थेट टीका केली आहे. (Turkey President Erdogan says Joe Biden has Bloody Hands for backing Israel)

हेही वाचा: बिल गेट्स यांच्या राजीनाम्यामागे प्रेम प्रकरणाची चौकशी?

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान बायडेन यांच्यावर निशाणा साधला. इस्राईलला शस्त्रे विकण्याबद्दल त्यांनी अमेरिकेवर टीकेची झोड उठवली. अमेरिकी सरकारने इस्रायलला ७३५ दशलक्ष डॉलर्स किंमतीची शस्त्रे विकण्यास मान्यता दिली आहे. एर्दोगान म्हणाले, 'बायडेन आपल्या रक्तरंजित हातांनी इतिहास लिहित आहेत. गाझामध्ये होत असलेल्या हल्ल्यांत हजारोंच्या संख्येत नागरिक मृत्युमूखी पडत आहेत.

हेही वाचा: 12 वर्षाच्या मुलानं रॅपद्वारे सांगितलं पॅलेस्टिनचं दु:ख

त्यानंतर एर्दोगान यांनी ऑस्ट्रियाला लक्ष्य केले. ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हिएन्नामध्ये इस्रायली ध्वज फडकावल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पूर्व जेरूसलेममधील मस्जिद-ए-अक्सापासून सुरू झालेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

एका पाकिस्तानी वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, एर्दोगान म्हणाले की, मस्जिद-ए-अक़्साकडे जाणारे हात तोडून टाकले जातील. जरी संपूर्ण जग शांत झाले, तरी तुर्की आवाज उठवणारच आहे. सीरियन सीमेजवळ दहशतवाद्यांचा मार्ग ज्या पद्धतीने रोखला, त्याचप्रमाणे मस्जिद-ए-अक्साकडे जाणाऱ्याचे हात तोडले जातील.

हेही वाचा: मराठी वंशाच्या माणसानं थेट स्कॉटलंडच्या संसदेत घेतली खासदारकीची शपथ; व्हिडिओ

युद्ध थांबणार का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे प्रशासन इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. इस्रायलने गाझा स्थित काही वृत्तसंस्थांच्या इमारतीला लक्ष्य केल्याने अमेरिकेवरील दबाव वाढला आहे. वृत्तसंस्थांच्या इमारतीवरील हल्ल्याला बायडेन प्रशासनाने मोठी चूक मानली. या हल्ल्यामुळे इस्रायलबद्दल अमेरिकेचे मत थोडेसे बदलले आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image