साथी थांबविण्यासाठी डासांपासून ‘लस’;पहिली वैद्यकीय चाचणी यशस्वी

साथी थांबविण्यासाठी डासांपासून ‘लस’;पहिली वैद्यकीय चाचणी यशस्वी
Updated on

नॉम पेन (कंबोडिया) - पावसाळ्यात डासांपासून होणाऱ्या सर्व आजारांसाठी एकच वैश्‍विक लस तयार करण्याचा घाट शास्त्रज्ञांनी घातला आहे. त्यासाठी डासांच्या लाळेतील प्रथिनांचा लस म्हणून वापर करण्यात आला आहे. नॉम पेन शहरातील शास्त्रज्ञ डॉ. जेसिका मॅनिंग यांच्या अभिनव कल्पनेतून साकारलेल्या या लसीची पहिली वैद्यकीय चाचणी यशस्वी झाली आहे.

भारतासह उष्णकटीबंधिय क्षेत्रात पावसाळ्यात डासांतून मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरतात. यामध्ये हिवताप, डेंगी, चिकनगुनिया, झिका आदी संसर्गजन्य आजारांचा समावेश आहे. डासाच्या लाळेमधील प्रथिने अशा आजारांविरुद्ध मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीला चालना देते असे संशोधनातून समोर आले आहे. प्रथिनांतून विकसित केलेल्या लसीचे पहिल्या वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष नुकतेच नुकतेच ‘लॅन्सेट’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. 

डॉ. मॅनिंग याच्या संशोधनाची व्याप्ती स्पष्ट करताना अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील वॉल्टर रिड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चचे शास्त्रज्ञ मॅक क्रॅकन म्हणतात, ‘‘पृथ्वीवरील सर्वांत प्राणघातक प्राणी म्हणजे डास आहेत. डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांवर एकच वैश्‍विक लस विकसित करणाऱ्या या संशोधनाचे सुरुवातीचे परिणाम मूलभूत पाया रचणारे आहेत. झिका, इबोला आणि डेंगीच्या आजारांवरील संशोधनाला अमेरिकेचा संरक्षण विभाग मदत करत आहे.’’

वाहकालाच लक्ष्य केले 

  • संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठीची अभिनव पद्धत 
  • आजाराला कारणीभूत वाहकाच्या (डास) माध्यमातूनच लस तयार केली 
  • डासांच्या लाळेतील प्रथिनांनाच प्रतिकार करण्याची शरीराला सवय लावण्यात आली 
  • २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार ऍनॉफिलस डासांपासून तयार केलेल्या लसीमुळे हिवताप होत नाही 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com