रशियन सुपरमार्केटमध्ये साखरेसाठी नागरिकांची धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये रशियन सुपरमार्केटमध्ये नागरिक साखरेसाठी धक्काबुक्की करताना दिसत आहे
Viral Video
Viral Videoसकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेन युद्ध गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. युद्धामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसलाय. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रशियन सुपरमार्केटमध्ये नागरिक साखरेसाठी धक्काबुक्की करताना दिसत आहे. (Viral Video)

Viral Video
... तर RSS ला जनाब संघ म्हणणार का? : संजय राऊत

रशियात साखरेचे भाव गगनाला भिडले असल्याचे चित्र आहे. युद्धादरम्यान रशियात सर्व रशियन स्टोअरमध्ये केवळ 10 किलो साखर ठेवण्याची मर्यादा घातली आहे. त्यामुळे रशियन सुपरमार्केटमध्ये नागरिक साखरेसाठी गर्दी करत आहे. या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला जातोय. या व्हिडिओत रशियन सुपरमार्केटमध्ये नागरिक साखरेसाठी आपापसात धक्काबुक्की करताना दिसत आहेत

रशियात साखरेच्या दरात सुमारे 31 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरल बघून रशियात निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी युजर्स पुतिन यांना जबाबदार धरत आहेत. रशियात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत असल्याने युजर्स पुतिनवर टीका करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com