कुटुंबातील सदस्यच करेल पुतिन यांची हत्या?; मुली, माजी पत्नीवर संशय!

vladimir putin
vladimir putinVladimir Putin

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला एक महिनाहून अधिक काळ लोटला आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या भूमीवर बराच विध्वंस केला असला तरी अपेक्षेप्रमाणे यश आलेले नाही. दुसरीकडे, युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे सातत्याने जगाच्या निशाण्यावर आहेत. पुतिन यांच्या हत्येची (Discussion of murder) चर्चा उडत आहे. आता कुटुंबातील सदस्यच पुतिन यांना मारू शकतात, असा नवा दावा करण्यात आला आहे. यात त्याच्या मुली आणि माजी पत्नीचाही समावेश आहे.

रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची हत्या (Discussion of murder) होऊ शकते अशी कुजबुज सुरू आहे. युक्रेनमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांचे नातेवाईक रशियात राहतात आणि पुतिन यांच्यावर रशियाच्या आक्रमकतेबद्दल प्रचंड नाराजी असल्याचे समोर आल्याने या अफवांना अधिक बळ मिळाले. पुतिन यांच्या हत्येचा कट रचला जात असेल तर त्यामागे जवळच्या व्यक्तीचा हात असू शकतो, असा कयास ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ डॉ. लिओनिड पेट्रोव्ह यांनी व्यक्त केला आहे.

vladimir putin
UP : उपमुख्यमंत्र्यांचा मुलाचा अपघात; कारने ट्रॅक्टरला दिली धडक

६९ वर्षीय पुतिन यांनी १९८३ मध्ये ल्युडमिलासोबत लग्न केले. त्यांना तिच्यापासून मारिया फासेन (३६) व कॅटरिना टिखोनोवा (३५) असे दोन मुली आहेत. पुतिन (Vladimir Putin) यांनी २०१३ मध्ये ल्युडमिलासोबतचे वैवाहिक संबंध संपवले. याशिवाय १८ वर्षीय लुइजा रोझोवा ही पुतिन यांची मुलगी मानली जाते. मात्र, पुतिन (Vladimir Putin) यांनी हे कधीच जाहीरपणे मान्य केले नाही. त्यांनी फक्त आपल्या दोन मुलींनाच स्वीकारले आहे.

... ती एक महिला असू शकते

जर कोणी हत्येचा प्रयत्न केला तर ती एक महिला असू शकते. कदाचित त्यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांची मुलगी, माजी पत्नी किंवा पुतिन यांना जवळून ओळखणारी कोणीतरी असू शकते असा मला विश्वास आहे, असे news.au सोबत बोलताना डॉ. लिओनिड पेट्रोव्ह म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com