बापरे! प्रत्येक तासाला सापडतात ब्रेन ट्यूमरचे 6 रुग्ण; एशिया पेसिफिक जनरलचा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

मुंबई: प्रत्येक तासाला ब्रेन ट्यूमरचे 6 रुग्ण सापडत असुन दरवर्षी भारतात 50 हजार लोक ब्रेन ट्यूमरने ग्रस्त होतात असा अहवाल एशिया पेसिफिक जनरल रिसर्च मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. 8 जुन या दिवशी जगभरात जागतिक ब्रेन टयूमर दिन पाळला जातो. या निमित्ताने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई: प्रत्येक तासाला ब्रेन ट्यूमरचे 6 रुग्ण सापडत असुन दरवर्षी भारतात 50 हजार लोक ब्रेन ट्यूमरने ग्रस्त होतात असा अहवाल एशिया पेसिफिक जनरल रिसर्च मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. 8 जुन या दिवशी जगभरात जागतिक ब्रेन टयूमर दिन पाळला जातो. या निमित्ताने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

जगात दर दिवशी एक लाखमधील दहा लोक ब्रेन ट्यूमरच्या कारणावरुन मरतात. भारतात दर वर्षी 40 ते 50 हजार लोकांना ब्रेन ट्यूमरची नोंद होते. त्यात 10 टक्के रुग्णांची एकट्या महाराष्ट्रात नोंद होते. या आकडेवारीनुसार, प्रत्येक तासाला देशात 6 रुग्ण नव्याने समोर येतात. 

हेही वाचा: भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...

एशिया पेसिफिक जनरल अभ्यासानुसार, जगात डोक्याच्या आजारात वाढ होऊन दर वर्षी 2 हजार 500 हून अधिक भारतीय मुले मेडूलोब्लास्टोमाने ग्रस्त असल्याचे समोर येतं. तर, दरवर्षी 40 ते 50 हजार लोकांमध्ये ब्रेन ट्यूमर आढळून येतो. यात 20 टक्के मुलांचा समावेश आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा फक्त 5 टक्के एवढा होता. 

मुलींमध्ये ब्रेन टयूमरचे अधिक प्रमाण:

कर्करोगावर केलेल्या अभ्यासानुसार, ब्रेन टयूमर सर्वाधिक मुलींमध्ये आढळतो. त्यामूळे, भारत सरकारने ब्रेन टयूमरवर आळा घालण्यासाठी स्क्रिनींग , रोगाचे लवकर निदान आणि काळजी, उपचार मिळावेत म्हणुन अनेक कार्यक्रम राबवत राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम ही राबवला जात आहे. 

ब्रेन टयूमर कसा होतो ? 

जेव्हा मानवी शरीरात कोशिकांची अनावश्यक वाढ होते. मात्र या अतिरिक्त कोशिकांची शरीराला गरज नसते. याच अवस्थेला कर्करोग म्हणून संबोधले जाते. मेंदुच्या कोणत्या तरी भागात अश्या पध्दतीने तयार होण्याऱ्या अतिरिक्त कोशिकांना ब्रेन टयूमर नावाने ओळखले जाते. 

ब्रेन टयूमर ची लक्षणे काय ? 

डोक्याच्या आकारात अचानक बदल होऊन सतत डोकं दुखणे, किंवा डोळे दुखणे, उलटी होणे, कानाजवळ गाठ होणे, कमी ऐकू येणे, किंवा सतत कानातुन शिटी सारखा आवाज ऐकू येणे या लक्षणांना हलक्यात घेऊ नये. चिकित्सकांच्या मते सुरुवातीच्या काळात अशी लक्षणे दिसणार्या रुग्णांना एमआरआय आणि सिटीस्कँन करण्यास सांगितले जाते. ज्यामुळे टयूमरला कर्करोग होण्यापासून वाचवता येते. ब्रेन टयूमर कोणत्याही वयात होऊ शकतो. 

हेही वाचा: अनलॉकच्या पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी...

1 लाखांमध्ये 10 ते 15 लोकांना ब्रेन टयूमर:

ब्रेन टयूमर हा एक गंभीर आजार आहे. फक्त डोक्यावरच याचा परिणाम नाही होत तर, संपुर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. न्यूरोसर्जन तद्यांच्या मते 20 ते 40 वर्षीय वयोगटातील लोकांना ब्रेन टयूमर दिसून येतो मात्र तो बरा होऊ शकतो. तर, 50 वयोगटातील लोकांना अधिकतर कर्करोग होऊ शकतो. त्याचे उपचार ही कठीण होतात. एका लाखात 10 ते 15 लोकांना ब्रेन टयूमर होतो.

6 brain tumor patients found every hour said asia pacific general 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 brain tumor patients found every hour said asia pacific general