esakal | बालायाम योग : वाचा किती सुरक्षित आहे हा व्यायाम व फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

बालायाम योग : वाचा किती सुरक्षित आहे हा व्यायाम व फायदे

बालायाम योग : वाचा किती सुरक्षित आहे हा व्यायाम व फायदे

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : तुम्ही तुमच्या सभोवताली अशी लोक नक्की पाहिली असतील जे नेहमी नखं एकमेकांवर घासत असतात. जे असं काहीच करत नाही त्यांना ही क्रिया खूप आश्‍चर्यजनक वाटते. ही क्रिया अत्यंत लाभदायी आहे. याला इंग्रजीत नेल रबिंग एक्झरसाइज म्हणतात, तर मराठीत याला बालायाम योग असे म्हणतात. हा एक असा योग अभ्यास आहे ज्यात योग आणि रिफ्लेक्सोलॉजी दोन्ही रूपांत मान्यताप्राप्त आहे. हा योग केल्याने आश्‍चर्यकारक फायदे होतात. (Balayam-Yoga-Nail-rubbing-exercises-Hair-News-hair-exercise-news-nad86)

बालायाम योग केसांना उत्तम आणि निरोगी राखण्यासाठी काम करतो. कारण, नखांच्या खाली ज्या नसा असतात त्या डोक्याच्या क्षेत्राशी जोडलेल्या असतात. नखं एकमेकांवर घासले तर रक्ताभिसरणाच्या गतीने नसा प्रोत्साहित होतात आणि केसांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल्यानेच या योगाभ्यासाचे महत्त्व वाढले आहे. बालायाम हा शब्द दोन शब्दांपासून मिळून तयार झाला आहे. बाल आणि व्यायाम म्हणजे केसांचा व्यायाम. चला तर जाणून घेऊया या वायामाविषयी...

हेही वाचा: थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

नखं एकमेकांवर घासल्याने डायहाइड्रोटेस्टोस्टेरोन हार्मोनचा स्तर सुद्धा नियंत्रित करण्यात मदत मिळते. हे केसांच्या विकासासाठी आवश्यक असते. शिवाय त्यांचा रोम सुद्धा पुन्हा अँक्टीव्ह होतो. सोबतच नखे रगडल्याने केस पांढरे होणे, केस अधिक गळणे, टकलेपणा आणि अनिद्रा यासारख्या समस्या सुद्धा कमी केल्या जाऊ शकतात. केसांच्या काही समस्या असतील व नसतील तरी केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हा योगाभ्यास करू शकता.

बालायाम योग म्हणजे रिफ्लेक्सोलॉजी रिफ्लेक्स एरियावर दबाव टाकण्याची एक पद्धत आहे. हो योग केल्याने अवयवांच्या काही भागांना आराम मिळतो. या योगामुळे केसांच्या रोममध्ये असलेला रक्तप्रवाह सुरळीत होतो. सोबतच केस मजबूत देखील होतात आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होते. हा योग केल्याने केसांची वाढ देखील वेगाने होते. नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणात सुरळीत होते. असे केल्याने हृदय आणि फुफ्फुसे यांना सुद्धा काही प्रमाणात फायदा होतो.

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

यांनी करू नये हा व्यायाम

गरोदर स्त्रियांनी हा योग करू नये. यामुळे त्यांच्या गर्भाशयात समस्या निर्माण होऊ शकतात आणि ब्लड प्रेशरचा स्तर वाढू शकतो. हा व्यायाम रक्ताभिसरण वाढवण्यासोबतच ब्लड प्रेशर देखील वाढवतो. ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी हा योग करू नये. नखे वा स्कीन संदर्भात आजार असलेल्यांनी देखील हा योगाभ्यास करू नये. ॲपेंडिसाइटिस आणि एंजियोग्राफी सारख्या सर्जिकल समस्या असतील तरी देखील तुम्ही नखे एकमेकांवर घासण्याची ही पद्धत ट्राय करू नका. यामुळे हृदयाची धडधड आणि उच्च ब्लड प्रेशरची समस्या अधिक वाढू शकते.

योग पूर्णपणे नैसर्गिक

बालायाम योगाचे काही दुष्परिणाम नाही. रोज पाच ते दहा मिनिटांसाठी दोन वेळा हा योग केला तर चांगले परिणाम दिसून येतील. पहिल्याच प्रयत्नात हा योग जमेल असेही काही नाही. रोज सराव कराल तेव्हा हळूहळू यात कौशल्य प्राप्त करू लागाल आणि सहज हा योग करू शकाल. हा योग पूर्णपणे नैसर्गिक असून याचा तसा काही मोठा दुष्परिणाम नाही.

Balayam-Yoga-Nail-rubbing-exercises-Hair-News-hair-exercise-news-nad86)

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image