गर्भनिरोधक गोळ्यांबाबत काही गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात, सेक्स लाईफवर होतो परिणाम!

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 January 2021

प्रेग्नेंसी रोखण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा (Contraceptive Pills) वापर केला जातो

नवी दिल्ली- प्रेग्नेंसी रोखण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा (Contraceptive Pills) वापर केला जातो. पण, ज्या महिला खूप काळापर्यंत या गोळ्यांचे सेवन करतात त्यांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मेडिकल न्यूज टूडेनुसार, गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम केवळ महिलांच्या आरोग्यवरच पडत नाही, तर त्यांच्या सेक्स लाईफवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या गोळ्या लॅबमध्ये तयार झालेल्या दोन हॉर्मोनपासून बनतात, प्रोजेस्ट्रोन आणि एस्ट्रोजेन असं त्यांचं नाव आहे. 

गर्भधारणा करण्यासाठी किंवा न करण्यासाठी प्रोजेस्ट्रोन आणि एस्ट्रोजेन हार्मोन महत्वाची भूमिका बजावतात. नियमितपणे या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात गर्भधारणेची स्थिती बनत नाही. याला ओरल कॉन्ट्रोसेप्टिव (Oral Contraceptive) म्हटलं जातं. गर्भनिरोधक गोळ्याचे काय साईड इफेक्ट होतात हे आपण बघुया...

'आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे, पण...'; शेतकरी आंदोलनावर सुप्रीम...

ब्रेस्टमध्ये सूज

अनेक महिलांमध्ये गोळ्यांचं सेवन केल्यानंतर ब्रेस्टमध्ये सूज आल्याची समस्या जाणवते. काही महिलांच्या म्हणण्यानुसार याच्या सेवनामुळे ब्रेस्टचा आकारही वाढतो. सेवनानंतर काही दिवसातच ब्रेस्टमध्ये सूज जाणवत असल्यास खाण्यात मीठाचे प्रमाण कमी करा. 

सेक्स लाईफवर होतो परिणाम

काही अभ्यासात दावा करण्यात आलाय की ज्या महिला या गोळ्यांचं सेवन जास्त काळापर्यंत करतात, त्यांची सेक्स लाईफ प्रभावित होऊ लागते. जर तुम्हाला सेक्स ड्राईव्हचा अनुभव येत असल्यास तत्काळ डॉक्टरांची भेट घ्या. 

प्रायवेट पार्ट डिस्चार्ज

जर महिलेच्या प्रायवेट पार्टमधून गडद आणि पांढऱ्या रंगाचे डिस्चार्ज होत असेल तर याला नॉर्मल आणि हेल्दी डिस्चार्ज म्हणतात. पण, सोबत खाज, जळजळ किंवा इरिटेशन होत असल्यास डॉक्टरशी संपर्क साधा कारण हे यीस्ट इंफेक्शन असू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जास्त गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यामुळेही असं होऊ शकतं. पण, जर पिवळ्या रंगाचे डिस्चार्ज होत असेल तर साधव व्हा, हे बॅक्टोरियल किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इंफेक्शनची सुरुवात असू शकते. 

तरुणाची फेसबूवर झाली अल्पवयीन मुलीशी मैत्री ! पाच महिन्यानंतर 'असे'...

वजन वाढणे

गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन जास्त काळापर्यंत केल्याने महिलांमध्ये लठ्ठपणा वाढू शकतो. अनेकवेळा गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने शरीराचे वजन मोठ्या गतीने वाढायला लागते. या गोळ्यांमुळे शरीरात फ्लूईड रिटेंशन वाढते. 

डोकेदुखी आणि तणाव

गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन केल्याने महिलांना डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. तसेच अनेक महिलांना तणाव जाणवू शकतो. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर गोळ्याचा डोस कमी करुन पहा, पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण स्वत:च्या मर्जीनुसार डोस कमी किंवा जास्त केल्याने समस्या निर्माण होऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birth control pills effect on the life of women know everything