दीया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा!

Dia-Mirza
Dia-Mirza

माझी अंगकाठी मुळातच चांगली असल्याने मला कॉलेजला असतानाच मॉडेलिंगसाठी विचारले जायचे. मी हळूहळू मॉडेलिंगला सुरुवात केली. स्वतःच्या शरीराकडे जास्त चांगले लक्ष द्यायला शिकले.

त्यानंतर मला ‘मिस एशिया पॅसिफिक’ पुरस्कार मिळाला आणि मी प्रकाशझोतात आले. तंदुरुस्त शरीर ही अभिनय क्षेत्राची गरज असते. मला तर वाटते, ही प्रत्येक सामान्याचीच गरज असते. यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मी माझ्या वर्कआउटची सुरुवात दररोज ट्रेडमिलवर चालून करते.

त्याचबरोबर वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, क्रॉस फिट एक्सरसाईज आणि फंक्शनल ट्रेनिंग असा ४५ मिनिटांचा व्यायाम करते. जीमसोबतच मी योगासने करण्यालाही प्राधान्य देते. यामुळे शांत राहण्यास मदत होते. मी प्रवासात असते तेव्हा व्यायामासाठी स्वीमिंग, डान्स किंवा हॉर्स रायडिंगचे पर्याय निवडते.

आहाराच्या बाबतीतही मी दक्ष असते. मी थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात जेवणे पसंत करते. सकाळी उठल्यावर मी कोमट लिंबू पाणी पिते. त्याचबरोबर टोमॅटो किंवा गाजराचा ज्यूस घेते. त्यानंतरच्या नाश्‍त्यात मी पांढरे ओट्स किंवा तीन अंडी खाते. थोड्या वेळाने बाऊलभरून फळे खाते. दुपारच्या जेवणात मी घरचे जेवणच घेते. यामध्ये भात, डाळ, चिकन, भाजी खाते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“Raise your words, not voice. It is rain that grows flowers, not thunder.” - Rumi #sundaymood

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

जेवल्यानंतर ग्रीन टी घेते. थोड्या वेळाने मूठभर शेंगदाणे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यात टोस्ट खाते. रात्रीच्या जेवणात ग्रीन सलाड आणि ग्रील्ड मासे किंवा चिकन खाते. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया किंवा सुकामेवा खाते. वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीन शेक घेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com