तुमची मुलं एकलकोंडी झालीयेत? मग वेळीच द्या लक्ष

लॉकडाउनमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम
children
children

कोरोना (corona) काळ हा प्रत्येकासाठी अतिशय कसोटीचा आहे. कोरोना संसर्गाच्या भितीपायी घरातच रहावे लागत असल्याने वयस्कर व्यक्तींसह, लहान मुलांच्या (children) मनावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. कोरोनामुळे शाळा बंद, सतत घरात राहणं, मित्रपरिवार न भेटणं यामुळे मुलांच्या मानसिकतेवर हळूहळू परिणाम होऊ लागला आहे.बरीच लहान मुलं नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या मानसिक समस्यांना समोरं जात आहेत. अशा स्थितीत आपल्या मुलांचे मानसिक आरोग्य जर चांगले राखायचे असेल तर त्याची महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे, असं तज्ज्ञ डॉक्टरांचं मत आहे. (corona has impacted the lives of the children)

कोरोना आणखी काही महिने आपली पाठ सोडणार नाही. वर्षभराहून अधिक काळ राहिलेल्या या लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचाच मानसिक ताण वाढत चालला आहे. रोजचं रूटीन गडबडल्या कारणाने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावरील परिणामांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर लॉकडाउन अधिक काळ असाच सुरू राहिला तर लहान मुला-मुलींना अनेक मानसिक समस्याचा सामना करावा लागू शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

children
नदीच्या पाण्यातून कोरोनाचा प्रसार?

तुमची मुले चिंताग्रस्त आहेत का? कोविडशी संबंधित बातम्या पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्यांच्या वागण्याबोलण्यात बदल होतो का? विषाणूची लागण होण्याच्या भितीमुळे वारंवार मुलं हात स्वच्छ करतात का? आपल्या मुलांना रात्री झोपेत कोरोनाची स्वप्ने पडतात का? मुलांच्या वागणुकीत काही बदल जाणवत आहेत का? असे असल्यास आपल्या मुलांना मानसिक आरोग्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष द्या आणि तातडीने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी सांगितलं. तसंच कोहिनूर रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल काबरा म्हणतात, लॉकडाउनचा विपरित परिणाम हा मोठ्यांसह लहान मुलांवरही होऊ लागला आहे. परिणामी मोठ्यांचं बदललेलं वागणं पाहून मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ लागला आहे.

शाळा, मैदाने बंद असल्याने मुलांना दिवसभर घरातच बसून रहावे लागत असल्याने ती अक्षरशः कंटाळून गेली आहेत. कोरोना संसर्गामुळे पालक मुलांना खेळायला बाहेर पाठवत नसल्याने ही मुलं एकलकोंडी बनत चालली आहे. यामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंता व तणाव वाढतोय. मुलं हिसंक बनू लागली आहेत. त्यातच आजुबाजूला कोरोनाच्या चर्चा असल्याने मुलांच्या कोवळ्या मनात भिती दाटून येत आहे. अशावेळी मुलांच्या स्वभावातील हे बदल पालकांनी ओळखणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच ही गोष्ट कळल्यास मुलांना मानसिक आजारातून पटकन बाहेर काढता येऊ शकते.

अशी घ्या मुलांच्या मानसिकतेची काळजी

१. आपल्या मुलांना कोरोना विषाणूची पुरेशी माहिती करून द्या. मुलांनी टीव्हीवर कोणते कार्यक्रम पाहावेत याविषयी त्यांना सांगावं.

२. मुलांना सोशल मीडियापासून शक्य तितक्या लांब ठेवा. त्याऐवजी त्यांना घरच्या घरी शैक्षणिक चित्रपट दाखवा. जेणेकरून त्यांचे मनोरंजन होईल.

३. मुलांबरोबर घरी वेळ घालवण्यासाठी बुद्धिबळ, कॅरम यांसारखे बैठी खेळ खेळा. पुस्तक वाचणे, व्यायाम करणे आणि संगीत ऐकूनही तुम्ही मुलांसोबत राहु शकता. असे केल्याने आपल्या मुलांना आनंद होईल.

४.मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करा.

५. आपल्या मुलाला घरी कंटाळा येऊ नये, यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या कामात सतत व्यस्त ठेवा.

६. आपली मुलं घरी कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करत आहेत ना, याची खात्री करून घ्या. चेहऱ्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात स्वच्छ धुवणे, याचे महत्त्व मुलांना पटवून द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com