"आत्महत्या एक नपुंसकत्व..."

stress
stress

जन पळभर म्हणतील 'हाय हाय'!
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल काही का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेते पिकतील,
गर्वाने या नद्या वाहतील,
कुणा काळजी की न उमटतील,
पुन्हा तटावर हेचं पाय...

सखे सोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपुल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जाता त्यांचे काय जाय?

रामकृष्ण ही आले गेले।
तया विना हे जग ना अडले।।
कुणी सदोदित सुतक धरिले।
मग काय अटकले मज शिवाय।।

अशा जगास्तव काय कुढावे,
मोही कुणाच्या का गुंतावे,
हरिदूता का विन्मुख व्हावे,
का जिरवू नये शांतीत काय?

जन पळभर म्हणतील 'हाय हाय'!...

सुप्रिसद्ध मराठी गीतकार भा. रा. तांबे यांची ही वरीलप्रमाणे शब्द रचना ज्यांनी ऐकली, वाचली, समजली आणि आचरली ते सर्व त्यांचे स्वतःचे आयुष्यात अगदी सहजपणे तरले आणि मस्तं जगले इतकेच नाही तर, इतरांनाही जगण्याचे सुंदर कलात्मक प्रशिक्षण प्रत्यक्षात देऊन अमर झाले...

संत कबीर त्यांच्या चपखल दोह्यांमधून म्हणतात...

"ज्ञानी तो निर्भय भया, मानै नाहि संक।
इंद्रिन केरे बसि पडा, भुगते नरक निसंक।।"

अर्थात : 'वाचिक ज्ञानी लोक आत्मसाक्षात्कार झाल्यासारखे निर्भय होऊन जगतात, पाप पुण्याबद्दल निःशंक असतात. असे लोक इंद्रिय सुखात मशगूल राहून,सरतेशेवटी नरकात जाऊन पडतात.'

"ज्ञानी युक्ती जनाइया, को सुनि विचार।
सूरदास की इस्तरी का पर करे सिंगार"।।

अर्थात : 'विचारवंतांनी स्वरूपस्थितीची युक्ती ओळखली. परंतु, ते विचार ऐकून इतर लोक विचार करतील का? अंध व्यक्तीच्या पत्नीने कितीही साज-शृंगार केला तरी, ती व्यक्ती तो पाहू शकणार नाही. अविचारी व्यक्तीपुढे वैचारिक गोष्टी करणे व्यर्थ आहे.'

संत कबीर पुढे म्हणतात,-
"बुझ सरीखी बात है, कहन सरीखी नाहि।
जे ते ज्ञानी देखिये, ते ते तैसे नाहि"।।
"आतम अनुभव जब भयो, तब नहीं हर्ष विषाद।
चित्र दीप सम रहे, तजिकर वाद-विवाद"।।

अर्थात : 'एकदा का आत्मसाक्षात्कार झाला, आत्मज्ञान झाले की, माणूस सुख-दुःखाच्या पलीकडे जातो. सगळे वाद-विवाद, परामर्श टाळून चित्रातल्या दिव्यासारखा स्थिर होतो. त्याची ज्योत वाऱ्याच्या झुळुकीने फडफडत नाही.'

"दया का लच्छन भक्ती है, भक्तीसे होवै ज्ञान।
ध्यान से मिलता ज्ञान है, यह सिद्धांत उरान"।।

अर्थात : 'दया ही परमेश्वराची भक्तीच आहे. ह्या दयाभावाने, भक्तिभावाने ध्यानात प्रगती होते व ध्यानात प्रगती झाल्यावर 'आत्मज्ञान' प्राप्त होते. हा गहन सिद्धांत उरी बाळगावा, असा उपदेश संत कबीरांनी त्यांच्या ह्या दोह्यात केला आहे.'

"कबीर सोई पीर है, जो जानै पर पीर।
जो पर पीर नै जानई, सो काफ़िर बेपीर।।

अर्थात : 'ज्या कुणाला दुसऱ्या माणसाचे दुःख समजते तोच खरा पीर म्हणजे साधूपुरुष आहे. ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव नाही, तो काफ़िर, अधर्मी, ढोंगी साधू आहे.'

तर थोर संत आणि सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट गुरू 'संत श्री रामदास स्वामी'  "देहधारणा-देहरक्षण प्रयोजना" बाबत म्हणतात...

"सदा सर्वदा दक्षता बाळगावी
सुरक्षितता ना कधी विसरावी
विश्वास ठेवी सदा साधनांचा
होईल अपघात मग सांग कैचा?।।

मना देह ही निर्मिती ईश्वराची
तशी मालकी त्यावरी जाण त्याची
तयाचा निधी रक्षिणे भाग आहे
अशा देवकाजी सदा दक्ष राहे।।

तुझा देह एक मंदीर आहे
पहा राउळी त्या हरी नांदताहे
शरीरास सांभाळीणे काज तूझे
तुझा देह लावी सदा देवकाजे।।

जरी देह गोळा, खुळा, पांगुळा वा
अधू, आंधळा, वाकडा, मोकडा वा
फद्या, फाटका, फेपरा, पै निकामा
जरा-जीर्ण येई न केव्हाच कामा।।

जरी देह आहे, तरी सर्व पाहे
न देहाविना कोण कोणास पाहे
जयाने दिला देह त्या देवराणा-
पहाणे, जगी हेच कर्तव्य जाणा।।

न त्या भेटता काय लाभेल मुक्ती?
फुका जन्म सारा, फुकी सारी भक्ती!
अशा दिव्य देहास सांभाळ बाबा
तया दंडुनी देव भेटेल कां बा?।।

मना तुजला बोललो सूत्ररूपे
करोनि अति सुल्लभू आणि सोपे
तुझ्या सारख्या सूज्ञ श्रोत्यास सारे
हवे कासया अक्षरांचे पसारे!।।

देशभरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

आता आपले भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील, एक नामवंत अवलिया, तसेच जगप्रसिद्ध सर्वोकृष्ट पुरस्कार विजेते, सुपर अँग्री-यंगमॅन हिरो, डॉन, शहेनशहा इत्यादी आभूषणांनी अलंकारित आणि पद्मश्री पुरस्कार विजेते माननीय श्री. अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्याच एका गाजलेल्या व बॉलिवूड बॉक्समध्ये हिट ठरलेला "मुकद्दर का सिकंदर" या हिंदी चित्रपटात काम करतांना एका गाण्यात असे म्हटले आहे की...

"रोतें हुए, आते है सब, हसता हुआ जो जायेगा, 
वो 'मूकद्दर का सिकंदर'
जानेमन कहेलायेगा।"

आता मला सांगा, या व्यक्तीच्या आयुष्यात काय कमी अडचणी आल्या? उलटपक्षी आपल्यापेक्षा खुपचं मोठ्या अडी-अडचणींवर त्यांनी अत्यंत स्थिरबुद्धीने आणि सुयोग्य विचार आणि कार्यपद्धतीने यशस्वीपणे मात केली इतकेचं नव्हे तर स्वतःला प्रत्येक वेळी समजून व समजावून घेऊन पुढे आपले दैनंदिन जीवन नुसतेच सुरळीत न करता इतके उंचावले की, त्यांचे नाव संपूर्ण जगात आज एक नामांकित आणि धनवान व्यक्तींमध्ये गणले तर जातेच, परंतु त्यांच्या पश्चातही त्यांचे नाव तितक्याच सन्मानाने व आदराने जगभरात अमरत्व गाजवणार आहे, हे देखील जवळपास निश्चितच आहे.

जे काही आहे थोरांकडे
ते सर्व आहे सर्वांकडे
नको फुका धावू मृत्यूकडे
अंती अनंता जाणेच तिकडे...

सुरक्षित अंतर : सुरक्षित आरोग्य

भीती नको : खबरदारी हवी

©डॉ. प्रशांत मंजिरे.
स्ट्रेस मॅनेजमेंट गुरू
(मानसोपचारतज्ञ व समुपदेशक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com