Reverse Walking केल्याने शरीराला होतात पाच फायदे!

रोज व्यायाम करण्याचा कंटाळा आला असेल तर हा प्रकार नक्की ट्राय करा
Reverse Walking Benefits
Reverse Walking Benefits esakal

तंदुरूस्त राहण्यासाठी लोकं व्यायामाला महत्व देतात. त्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी नियमित चालणं- धावणं पसंत करतात. रोज अशाप्रकारे व्यायाम(Exercise) केल्याने शरीराला खूप फायदा होतो. पण तुम्ही उलट चालण्याचा (Walk) विचार करताय का? काही लोक गंमत म्हणून उलटं चालण्याचा विचार करतात. पण तुम्ही अशाप्रकारे चालल्यास शरीराला (Body) त्याचे फायदे होतील.

Reverse Walking Benefits
व्यायाम, डाएट न करता होईल वजन कमी, शास्त्रज्ञांनी शोधला नवा उपाय

तज्ज्ञांनुसार, उलट चालणे किंवा बॅक स्टेप चालण्याने तुमच्या हृदय, मेंदू आणि चयापचय क्रियेला खूप फायदा होतो. तसेच कॅलरीजही कमी होतात. आरोग्यतज्ज्ञ लोरी शेमेक यांच्या मते, १०० पावले उलट चालणे हे १००० पावले सरळ चालण्याच्या बरोबरीचे असते. उलट चालण्यामुळे तुमचे हृदय (Heart) जलद गतीने पंप करते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा अधिक जलद होतो. त्यामुळे अशा प्रकारे चालण्याचे पाच फायदे आहेत.

Reverse Walking Benefits
३ सेकंद व्यायाम केल्याने वाढते स्नायूंची ताकद, अभ्यासात स्पष्ट
Reverse Walking Benefits
Reverse Walking Benefits

असे आहेत ५ फायदे

१) स्नायूंसाठी फायदेशीर - उलट चालण्याने तुमच्या पोटरीचे स्नायू (Calf Muscle), क्वाड्रीसेप्स (Quadriceps) , ग्लूट्स (Glutus)वर चांगला परिणाम होतो. तरसेच मेंदूलाही वेगळ्या पद्धतीने कार्य करण्यास मदत होते.

२) स्ट्रोक असलेल्या रुग्णांनाही फायद्याचे - युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी गार्डनर न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटचे (University of Cincinnati Gardner Neuroscience Institute) संशोधक म्हणतात की उलट चालण्याचा सराव केल्याने स्ट्रोकचे रूग्ण पुन्हा चालायला लागू शकतात.

Reverse Walking Benefits
चाळीशीनंतर १० मिनिट व्यायाम केल्यास व्हाल दिर्घायुषी! अभ्यासातील निष्कर्ष

3) हृदयाला फायदा- उलट चालल्यामुळे शरीराच्या अवयवांचे संतुलन सुधारते,असे मानले जाते. तसेच खालच्या अंगांची हालचाल आणि चालणे यांचा समन्वय साधते. रेट्रो वॉकिंग केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे तुम्ही गुडघ्यांमधील सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता.

४) चयापचय वाढतो- तुमचे हृदय उलट चालल्याने वेगाने धडकते, तसेच चयापचय क्रियेत वाढ होते. तुम्ही कमी वेळेत अधिक कॅलरी बर्न करू शकता. तसेच शरीराचा समतोल राखण्यासाठी हा उत्तम व्यायाम असल्याचे मुंबईच्या सिम्बायोसिस हॉस्पिटलचे डॉ. अंकुर फटार्पेकर यांनी सांगितले.

५) दृष्टी सुधारते - वॉकहार्ट हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट सल्लागार डॉ.सौरभ गोयल यांच्या मते, उलट चालणे हे तुमच्या शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप चागले आहे. त्यामुळे तुमची दृष्टीही चांगली राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com