Weather Update : काळजी घेताय ना? ऊन-पावसाचा सुरू झालाय खेळ, आता आरोग्यासाठी द्या वेळ

सध्या विचित्र वातावरण सुरू असून दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Weather Update
Weather Updateesakal
Summary

यंदाच्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्या बरोबर दमट हवेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या व उद्‌भवतात.

Health Tips : सध्या विचित्र वातावरण सुरू असून दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील (Summer) विकार रोखण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या तापमानामुळे घामोळ्यांपासून उष्माघातापर्यंतचे विविध विकार होऊ शकतात.

याबाबत अधिक माहिती अशी की, आता उन्हाळा सुरू असूनही अधून-मधून अवकाळी पावसाच्या (Rain) सरी कोसळत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्या बरोबर दमट हवेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या व उद्‌भवतात. त्यातून डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. पण ऋतुमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य चांगले राहते.

जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते, तेव्हा आपले शरीरही काही बदल दाखवते, जसे की डिहायड्रेशन होणे, उष्माघात होणे, भूक मंदावणे, उन्हाळी लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, अॅसिडिटी होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, प्रचंड थकवा जाणवणे, घामोळ्या येणे, त्वचा कोरडी पडणे असे प्रत्येकाच्या प्रगतीनुसार लक्षणे कमीःजास्त दिसू शकतात.

Weather Update
Vaibhav Naik : शिंदे-फडणवीसांचा बाजार जनताच उठवणार; ठाकरे गटाच्या आमदाराचा थेट इशारा

उष्माघात कसा होतो..?

उन्हाळ्यात बाहेरील दिवसाचे तापमान बेचाळीस सेल्सिअसहून अधिक असते. उन्हामध्ये शरीरातील घाम निर्माण करणारे केंद्र बाहेरचे तापमान काहीही असो शरीराचे तापमान ३७.७ अंश सेल्सिअस कायम ठेवते. ऊन आणि गरम हवेच्या झोतामध्ये काम करावे लागते किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीराचे तापमान नियंत्रित न झाल्यास त्यामधील यंत्रणा कोलमोडून पडते आणि उष्माघात होतो.

Weather Update
Maharashtra politics : शरद पवारांचा आदेश आल्यास 'या' मतदारसंघातून लोकसभा लढवणार; रामराजेंची मोठी घोषणा

बचावासाठी उपाययोजना

उष्माघात (हीट स्ट्रोक) होऊ नये, याकरिता बऱ्याच उपाययोजना करू शकतो जसे की फिकट, पांढऱ्या रंगाचे, सैलसर तसेच हलक्या वजनाचे कपडे परिधान करा, बाहेर पडताना डोक्याला ऊन लागू नये म्हणून टोपी ,गॉगल, छत्री यांचा वापर करा. शक्यतो दुपारी बारा ते तीन या वेळात घराबाहेर पडू नका.

Weather Update
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्‍तारात कोण मारणार बाजी? कोल्‍हापुरातून 'ही' तीन नावं चर्चेत

उष्माघाताची कारणे

उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेहून शोषलेली उष्णता अधिक असते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते व उष्माघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर मृत्यू ओढवतो. उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमी ऊन अधिक राहते. उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान ३८.१ हून अधिक किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे सामान्यपणे दुपारी तापमान ३७.७० अंश सेल्सिअस असते. तुमच्या शरीराचे तापमान १०४ अंश आहेत किंवा त्याहून अधिक असल्यास उष्माघात होऊ शकतो.

Weather Update
Maratha Reservation : मराठा नेत्यांनी आवश्‍यक बाबींचा अभ्यास करावा; आरक्षणाबाबत आयोगाच्या सदस्यांचं स्पष्ट मत

सध्या उन्हाळ्यातील आहारामध्ये लिंबू-पाणी ठेवले तर तुम्हाला उन्हाळ्यात त्याचा फायदा होईल. तसेच तुमचे इतर कोणते आजार असतील तर तेही लिंबू-पाण्याच्या सहाय्याने कमी होण्यास मदत होईल. ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात, त्यांच्यासाठी लिंबू-पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.

-डॉ. वीरसेन पवार, रांजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com