हर्ड इम्युनिटी दोन पद्धतीने होते तयार, जाणून घ्या कशी करते काम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

मोठ्या संख्येनं लोकांना कोरोना झाला तर देशात हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि अँटिबॉडीज तयार होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल असं म्हटलं जात आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वेगाने वाढत चालला आहे. दिल्लीत नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान वेगवेगळ्या सर्व्हेमधून अशी माहिती समोर येत आहे की, दिल्लीत बहुतांश लोकांना कोरोना जाला असून काही लोकांमघ्ये लक्षणं दिसून आली तर काहींमध्ये लक्षणेच आढळली नाहीत. आरोग्य मंत्रालयानेसुद्धा याची माहिती दिली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची स्थिती आहे. तसंच वाढत्या प्रादुर्भावामुळे असंही म्हटलं जात आहे की, मोठ्या संख्येनं लोकांना कोरोना झाला तर देशात हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि अँटिबॉडीज तयार होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. 

राजधानी दिल्लीत 40 ते 45 टक्के लोकांमध्ये कोरोना अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे. तसंच दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढला आहे. अनेक तज्ज्ञांनी असंही मत व्यक्त केलं आहे की दिल्लीत कोरोना रुग्णांचा उच्चांक येऊन गेला आहे. दिल्लीत हर्ड इम्युनिटीचा दावा केला जात असून यामुळे देशात इतर भागांमध्येही यावर चर्चा सुरू झाली आहे. 

हे वाचा - जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाताय का ? तर आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

हर्ड इम्युनिटी ही कोणत्याही साथीच्या आजारावेळी लोकांच्या शरीरात तयार होणारी रोग प्रतिकारशक्ती असते. एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अशी प्रतिकार शक्ती तयार झाल्यास आजाराचा संसर्ग थांबतो. आरोग्य मंत्रालयाने हर्ड इम्युनिटीबद्दल सांगताना म्हटलं की, देशात कोरोनाशी लढण्यासाठी सध्या तरी हर्ड इम्युनिटी हा पर्याय असू शकत नाही. मोठ्या संख्येनं संसर्ग किंवा लसीकरण झालं असेल तरच सामुहिक रोग प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. मात्र यामध्ये लोकांच्या जीवालाही धोका असतो. हर्ड इम्युनिटीच्या आधारावर देश वाचवण्याचा विचार करता येणार नाही. 

हर्ट इम्युनिटी तयार होणं आणि ती तयार कऱणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा एखाद्या भागातील मोठ्या संख्येनं लोकसंख्येमध्ये प्रादुर्भाव झाला असेल आणि त्यातून रुग्ण बरे झाले असतील तर त्या लोकांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. अँटिबॉडीज तयार झाल्यानंतर व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यासाठी आवश्यक परिस्थिती मिळत नाही आणि संसर्गाचे प्रमाण कमी होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर शरीरात अँटिबॉडीज तयार कऱण्याचं काम लसही करू शकते. 

म्हशीचे दूध उत्तम की गायीचे.. जाणून घ्या कधी न सुटलेल्या कोड्याचे उत्तर

आपल्या शरीरात दोन प्रकारच्या इम्युनिटी असतात. एक असते इनेट इम्युनिटी आणि दुसरी असते अॅडेप्टिव इम्युनिटी. या दोन्हींची काम कऱण्याची पद्धत वेगवेगळी असते. इनेट इम्युनिटी ही अशी रोग प्रतिकार शक्ती असते जी कोणताही व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात गेल्यानंतर अॅक्टिव्ह होऊन तो संपवण्यासाठी काम करते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to work herd immunity in pandemic know