मधुमेहींनो, कोरोनापासून वाचण्यासाठी हे कराच!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे वेबिनारच्या माध्यमातून आयोजित "मधुमेहावर मात' या विषयावर ते बोलत होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे आणि एमआयटी स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. भानुदास कुचेकर हे उपस्थित होते.

पुणे : "संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मधुमेही रूग्णांनी स्वतःची काळजी घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवावी. अशा रुग्णांनी संपूर्ण तांदळाचे पदार्थ वर्ज्य करावे, सलाडाचे सेवन वाढवावे, घडाळ्याच्या काटानुसार उठण्याची व झोपण्याची वेळ ठरवावी आणि आहाराची निश्‍चित वेळ असावी. तसेच, मौन धारण करून मन प्रसन्न ठेवावे. शरीरासाठी योगासाधना ,प्राणायाम, कपालभाती व अलोम विमोल करावा,' असा सल्ला जागतिक स्तरावरील वक्ते, मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे वेबिनारच्या माध्यमातून आयोजित "मधुमेहावर मात' या विषयावर ते बोलत होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे आणि एमआयटी स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. भानुदास कुचेकर हे उपस्थित होते.

पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 

डॉ. नांदेडकर म्हणाले, मधुमेह हा रोग नाही तर शरीर रचनेत झालेल्या बदलाची व्याधी आहे. आपल्या जीवन शैलीतील असंतुलित बदल, आहार-विहार आणि त्यातून होणाऱ्या मानसिक तणावाची धारणा आहे. वर्तमानकाळात कोरोना व्हायरसमुळे जगभरात प्रभावित होणाऱ्या रुग्णांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रुग्ण हे मधुमेहाचे आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी. मानवी शरीराला ग्लुकोज मधून ऊर्जा मिळते. शरीर हे पेशींचे बनले आहे. त्यामुळे पेशींमध्ये रक्तात ग्लुकोजला घेऊन जाणारे इन्सुलियन हा दुवा आहे. समजा मेंदूला चार मिनिटे सुद्धा ग्लुकोज मिळाले नाही तर तो व्यक्ती कोमात जाऊ शकतो. वजन वाढले तर शरीराला अधिक ऊर्जा लागते, तेव्हा इन्सिुलियन कमी पडते.

आणखी वाचा - सिंहगडरोडवर हॉटेल चालकाचा खून

मधुमेही रुग्णात साखरेचे प्रमाण वाढल्याने मूत्रपिंड ते सहन करू शकत नाही. त्यामुळे रुग्णाची किडनी काम करत नाही. त्याच्या दुष्पपरिणामुळे शरीरात बदल घडतात. तसेच, तळपायात मुंग्या येणे, पायात गर्मी होते आणि नंतर त्यातील संवेदना संपते. त्यावेळी तणाव घेऊ नये. अशावेळेस रुग्णांचे "रिव्हर्स ऑफ डायव्हर्सिटी' करणे गरजेचे आहे. आयुर्वेदात रक्तशर्करा कमी करणारे द्रव्य आहेत. पुढचा येणारा काळ हा भयंकर त्रासदायक आहे. तसेच आयुष्याच्या पलिकडे काहीच नाही. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर द्यावा.

सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if you have Diabetes do this to avoid corona