काय, उंचावरून खाली पाहण्याची भीती वाटते? तुम्हाला असू शकतो ॲक्रोफोबिया; जाणून घ्या सविस्तर...

If you have phobia of height know about the Acrophobia
If you have phobia of height know about the Acrophobia

नागपूर : फोबिया (Phobia) म्हणजे भीती... भीती काय असते हे सर्वांना माहिती आहे. कारण, सर्वांना कशा ना कशाची भीती वाटतचं असते. ‘मला भीती वाटत नाही, मी कुणालाही घाबरत नाही’ असा म्हणणारा व्यक्ती या पृथ्वीतलावर तरी सापडणे कठीण आहे. कारण, भीती ही मानवी स्वभावाचा मूलभूत अंग असल्याने वाटतचं असते. काहींना आगीची भीती वाटते, काहींना विशिष्ट प्राण्यांची, कीटकांची, बंद जागेची तर काहींना उंचावर जाण्याची भीती वाटते. चला तर जाणून घेऊया भीतीच्या प्रकाराविषयी...

ब्लड इंजेक्शन फोबिया (ब्लड बघताच भीती वाटणे), ॲक्रोफोबिया (उंचीवरून खाली बघताना भीती वाटणे), ऑरथो फोबिया (पक्षांपासून भीती वाटणे), अग्यारो फोबिया (गर्दीत भीती वाटणे), क्लॉस्ट्रॉ फोबिया (बंद ठिकाणी असल्यावर भीती वाटणे), स्टेज फोबिया (स्टेजवर जाण्याची भीती), मुलाखत फोबिया, परीक्षा फोबिया असे फोबियाचे प्रकार आहेत. भीती असण्यामागे दोन कारण आहेत.

पहिला बायोलॉजिकल (लहानपणापासून) तर दुसरा कंडीशन रिस्पॉन्स म्हणजे एखद्या प्रसंगावरून भीती वाटते. उदा. पांढरा रंगाचा श्वान भूंकल्यानंतरची भीती. यामुळे एखाद्याच्या मनात पांढऱ्या रंगाविषयी भीती वाटायला सुरुवात होते. कोणतीही पांढरी वस्तू बघितल्यास भीती वाटायला लागते. याला कंडीशन रिस्पॉन्स असे म्हणतात.

क्लॉस्ट्रॉ फोबिया आणि अग्यारो फोबियाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. याची भीती ज्यांच्यामध्ये ते एकटे राहायला घाबरतात. अशे रुग्ण लिफ्टमध्ये एकटे जाऊ शकत नाही. बंद खेलीत एकटे राहू शकत नाही. एखाद्या मोठ्या हॉलमध्ये एकटे राहणे अशा लोकांना कठीण जाते. आपल्यासोबत काही वाईट होईल असे त्यांना सतत वाटत असते. यामुळे ते एकटे राहायला घाबरतात.

ॲक्रोफोबिया आजाराच्या रुग्णांना उंचावर गेल्यानंतर खाली बघितले की खाली पडू अशी तीव्र भीती वाटत असते. ज्यांच्या शरीरातील बॅलन्स सिस्टीम कमकुवत आहे किंवा त्यात दोष निर्माण होतो, अशा लोकांना ॲक्रोफोबिया असण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना ॲक्रोफोबिया आहे अशांना टीव्हीवर, एखाद्या व्हिडिओत किंवा चित्रपटात हिरो उंच इमारतीवरून खाली उडी मारताना बघून किंवा उंच इमारतीवर चढताना बघून त्रास होऊ शकतो. हे लोक अशावेळी सुप्तपणे त्या व्हिडिओत स्वतःची त्या परिस्थितीत कल्पना करतात त्यामुळे त्यांना हा त्रास होऊ शकतो, असे डॉ. डॉ. प्रवीण नवखरे यांनी सांगितले.

काय आहे ॲक्रोफोबिया?

ॲक्रोफोबिया म्हणजे उंचीची तीव्र आणि अतिशय जास्त स्वरूपाची भीती असणे. ही भीती असणारी व्यक्ती उंचावर गेल्यानंतर विचित्र वागते. जरी ती व्यक्ती धोकादायक ठिकाणी उभी नसली, किंवा अत्यंत सुरक्षित ठिकाणी उभी असली तरीही त्या व्यक्तीला तीव्र स्वरूपाची भीती वाटणे, टेन्शन येणे, अँझायटी किंवा अगदी मोठा पॅनिक अटॅक येणे असे प्रकार घडू शकतात.

भीती वाटल्यानंतर रुणात आढळताता ही लक्षणे

  • जोर जोरात श्वास घेणे
  • हृदयाचे ठोके वाढते
  • शरीरात कंपण जाणवणे
  • पॅनिक अटॅक (जीव जाते की का अशी भीती निर्माण होणे)
  • पोटात गुदगुल्या सारख होणे
  • सतत लघवी लागणे
  • सतत घाम येणे
  • काहीतरी वाईट होईल असे वाटणे

बिहेव्हीअर थेरपीचे दोन प्रकार

भीतीवर उपचाराचे एक्सपोजर थेरपी व फ्लडिंग थेरपी असे दोन प्रकार आहे. एक्सपोजर थेरेपीमध्ये रुग्णाला ज्याची भीती आहे, ती वस्तू हळुहळू दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पहिले खोटी, नंतर दुरून, नंतर जवळ नेऊन त्याची भीती दूर करण्याच प्रयत्न केला जतो. दुसऱ्या प्रकारात सरळ भीती असलेली वस्तू किंवा ठिकाण दाखवून भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. 

कॉग्नेटिव्ह बिहेव्हीअर थेरपी

या थेरपीमध्ये रुग्णाच्या मनात भीती कशामुळे निर्माण झाली याचा शोध घेतला जातो. त्याला मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. लहान मुलाला हे नको करू ते नको करू असे सांगितले जाते. यामुळे त्याच्या मनात त्या गोष्टीविषची भीती निर्माण होते. जेव्हा की ती गोष्ट नैसर्गिक असली तरी भीती वाटत असते. या थेरपीद्वारे रुग्णाची भीती काढण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर औषधोपचार करून उपचार केला जातो.

फोबियावर आहे उपचार
वास्तविक मनुष्य भित्रा प्राणी आहे. फोबिया हे अनेक प्रकारचे असू शकतात. तसेही फार उंच ठिकाणाहून कुठल्याही सामान्य माणसाने खाली बघितले तर भीती वाटतेच. प्रत्येकावर उपचार करण्याची पद्धतही वेगळी आहे. मात्र, फोबियाचे रुग्ण पुढे येत नाही. ते आजारासोबतच जगत असतात. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर व शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. ते आपली भीती व्यक्त करण्यास घाबरतात. फोबिया रुग्णांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता उपचारा समोर यावे आणि सामान्य जीवन जगावे.
- डॉ. प्रवीण नवखरे,
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com