
जीममध्ये घाम गाळण्यांत जगात भारतीय अव्वल, पहा किती लोकांनी जीमचे पैसे भरले?
जीममध्ये व्यायाम करण्याचा सध्या नवा ट्रेंड सुरु आहे. जो तो जीममध्ये व्यायाम करतो. तरुणाई तर यात अग्रेसर आहे. यात पैसे देऊन जीममध्ये व्यायामासाठी जाण्यात जगात भारतीय अव्वल असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. (Indians are ahead in the world for paying money for a gym)
भारतीय संस्कृतीत आधीपासूनच योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र भारतात पैसे भरून व्यायाम करणे, ही जीम संस्कृती तशी नवी आहे. मात्र त्यातही भारताने अनेक देशांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.
हेही वाचा: विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.. CBSE परिक्षेची हॉल तिकीटं जारी

आपल्या देशाच्या तुलनेत बाकी जगभरात प्रत्यक्ष जीममध्ये जाऊन घाम गाळण्याच्या बाबतीत लोक कमी असल्याचे दिसतात. यावरुन भारतात जीम ट्रेंड किती जोरदार सुरु आहे, याची कल्पना येईल.
भारतात २४ टक्के लोक जीम मध्ये जाऊन व्यायम करतात. या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत २१ टक्के,चीन २० टक्के, ऑस्ट्रेलिया १९ टक्के, इंग्लड १४ टक्के, अमेरिका १३ टक्के, जर्मनी ११ टक्के, कॅनेडा १० तर इटलीत ९ टक्के लोक जीम मध्ये जाऊन घाम गाळतात. फ्रान्समध्ये तर फक्त ४ टक्के लोकांनीच जीमच्या मेम्बरशिपचे पैसे भरल्याचं सांगितलं.
हेही वाचा: डास देताहेत डेंग्यूला आमंत्रण; जाणून घ्या लक्षणे
प्रामुख्याने भारत, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये जीम संस्कृती रुजलेली दिसते. भारतात युवक, युवती, पुरूष, महीला या सर्वांचा ओढा आता जीमकडे वळलाय. पुर्वीच्या काळी पारंपारिक व्यायाम शाळेला महत्त्व दिले जायचे. युवक वर्ग त्याकाळी लाल मातीत आपले आरोग्य बनवित असत पण कालांतराने व्यायामशाळेची जागा अत्याधुनिक जीमने घेतली आहे.
Web Title: Indians Are Ahead In The World Having Paid Money For A Gym
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..