esakal | कोरोनाबाधित आई बाळाला दुध पाजू शकते का? वाचायलाच हवं असं WHO चं उत्तर

बोलून बातमी शोधा

Breastfeeding}

जर आईला कोरोना झाला असेल तर ती आपल्या नवजात बाळाला स्तनपान करु शकते का? या प्रकारचे अनेक प्रश्न आजही अनेक महिलांच्या मनात असतील.

कोरोनाबाधित आई बाळाला दुध पाजू शकते का? वाचायलाच हवं असं WHO चं उत्तर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गर्भवती महिला आणि नवजात बाळाला जन्म दिलेल्या महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. आईकडून मुलाकडे हा व्हायरस जाऊ शकतो का हे असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते. जर आईला कोरोना झाला असेल तर ती आपल्या नवजात बाळाला स्तनपान करु शकते का? या प्रकारचे अनेक प्रश्न आजही अनेक महिलांच्या मनात असतील. या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काय उत्तरं दिलीयत, ते आपण जाणून घेऊयात...

हेही वाचा - लॉकडाऊन काळात पुरुषांपेक्षा महिला होत्या कमी आनंदी; एका अभ्यासाचा निष्कर्ष

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसने संक्रमित महिलेद्वारा नवजात बाळाला स्तनपान केल्याने आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा धोका आढळला नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे ज्या महिला मुलांना स्तनपान करु इच्छित आहेत, त्या करु शकतात. मात्र, हे करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 
या गोष्टींची घ्या काळजी
1. आईला नेहमी मास्क परिधान करावा लागेल. त्याशिवाय स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल.

2. नवजात बाळाला हातात घेण्याआधी तसेच घेतल्यानंतर हात जरुर धुवावे लागतील. हे नियमितपणे करावे लागेल. 

3. मुलाला घेऊन घरी अथवा हॉस्पिटल कोणत्याही ठिकाणी जाताना त्या-त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागेल. 

हेही वाचा - दोन पाकिस्तानी सुना परतल्या भारतात; वाघा बॉर्डरवरुन झाली सासरी पाठवणी

संक्रमित आईकडून नवजात बाळाला कोरोना होऊ शकतो का?
सीडीसी (सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रीव्हेंशन) च्या एका रिपोर्टमध्ये लिहलं गेलंय की आतापर्यंतच्या कोरोना व्हायरसने संक्रमित पीडित ज्या ज्या महिलांनी नवजात बाळांना जन्म दिलाय, त्या बाळांना कोरोनाचं संक्रमण झालेलं दिसून आलं नाहीये. तसेच आईच्या दुधामध्ये देखील कोरोना व्हायरसचं अस्तित्व आढळून आलं नसल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.