सावधान! दिवसभर बराच वेळ स्क्रीनसमोर असाल तर 'अशी' घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

लॅपटॉप, मोबाईलची स्क्रीन पाहण्यात तासंतास घालवणे शरीरासाठी आणि मानसिकदृष्या अपायकारक आहे. 

तुम्ही तुमचा टीव्ही बंद केला, मोबाईल पाहत बसलात आणि अचानक तुम्हाला कळाले के रात्रीचे दोन वाजले आहेत. आणि आता लॅपटॉपवर तुमचं काम सुरु करण्यासाठी काही तासच उरले आहेत. असा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल. कोरोना व्हायरसमुळे सध्या अनेकांना घरुनच काम करावे लागत आहे. शिवाय घराबाहेर जायलाही परवानगी नाही. त्यामुळे नुसतं स्क्रीन-स्क्रीन असं आपलं आयुष्य झालं आहे.  

एका रिपोर्टनुसार, लोकांचा स्क्रीन पाहण्याचा कालावधी कोरोना महामारी पसरण्याच्या आधिच्या काळापेक्षा 30 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे लोकांचा स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. मात्र, लॅपटॉप, मोबाईलची स्क्रीन पाहण्यात तासंतास घालवणे शरीरासाठी आणि मानसिकदृष्या अपायकारक आहे. 

तुमचा बराचसा वेळ स्क्रीनकडे पाहण्यात जात असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करु शकता--  

1. किती काळ स्क्रीनकडे पाहणे हितकारक आहे याबाबत काही ठोकताळा नाही. मात्र, तासंतास स्क्रीनसमोर बसून राहणे योग्य नाही. एका तासापेक्षा जास्त काळ तुम्ही स्क्रिनसमोर घालवणे अपायकारक आहे. दरवेळी 15 मिनिटांचा ब्रेक घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. 

गळ्यात खरखर होण्याची असू शकतात 'ही' कारणं, जाणून घ्या घरगुती उपाय

जास्तवेळ लॅपटॉप किंवा कॉम्युटर स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांवर ताण निर्माण होऊ शकतो. तसेच डोखेदुखी आणि डोळ्यात जळजळ होऊ शकते.

सायकल चालवण्याचे हे 5 फायदे तुम्हाला माहिती हवेच

2.  तुमच्या नकळत तुम्ही मोबाईल किंवा टॅबकडे का जाता? कारण तुम्हाला या गोष्टींची सवय झाली आहे. ही सवय मोडायची असेल तर तुम्हाला तुमचं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करावे लागेल. मोकळा वेळ मिळाला म्हणून मोबाईलकडे जाण्यापेक्षा दुसऱ्यांशी संवाद साधा. सतत मोबाईल किंवा टॅबमधील इंटरनेट सुरु ठेवण्यापेक्षा काम नसताना ते तुम्ही बंद करु शकतो. जेणेकरुन मोबाईलमध्ये आलेल्या मेसेजकडे तुमचे वारंवार लक्ष जाणार नाही.

तुमच्या पायांना हवीय आरामाची गरज ; कशी घ्याल काळजी वाचा...

3. तुमचा स्क्रीन वेळ तुम्ही निर्धारीत करा. कोणतीही गोष्ट करताना योजना बनवणे आवश्यक असते. दिवसातील या वेळी मी मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीन पाहणार नाही असं तुम्ही ठरवू शकता. 

कोरोना आपल्या फुफ्फुसांवर कसा करतो हल्ला? काय म्हणतात संशोधक...

सकाळी उठल्यानंतर थेट मोबाईलकडे जाण्यापेक्षा तुम्ही अन्य गोष्टी करु शकता. सकाळी मोबाईलमध्ये गजर लावण्यापेक्षा तुम्ही त्यासाठी एक गजर घडी घेऊ शकता. 

सगळं ठीक पण, मानसिक आरोग्याचं काय? तुम्हीच करा स्ट्रेस मॅनेजमेंट

सकाळपेक्षा रात्री स्क्रीनपासून दूर राहणं महत्वाचं आहे. झोपायला जाण्याच्या एक तासअगोदर मोबाईल पाहू नका. स्क्रीनमधून निघालेली निळ्या रंगाची लाईट तुमच्या बुद्धीला सकाळ असल्याचा भास करुन देऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला निद्रानाश होऊ शकतो. 

लॉकडाऊन कालावधीत झोपेचं गणित चूकतंय, अजिबात दुर्लक्ष करू नका...

4. लोकांशी संपर्क साधण्याचे वेगवेगळे मार्ग शोधा. झूम, स्काईप किंवा इतर व्हिडिओ कॉलिंग अॅपच्या माध्यमातून आपण मित्रांशी संपर्क साधतो. नेहमीच इतरांशी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून बोलणे गरजेचं नसतं. केवळ ऑडिओ कॉल करुन आपण इतरांशी चांगल्या रितीने जोडले जाऊ शकतो. 

तुम्हाला सतत तहान लागते का ...? मग वाचाच

5. शारीरिक हालचाली होणे आवश्यक आहे. कोरोना महामारी येण्यापूर्वी आपण ऑफीस संपल्यानंतर मित्रांसोबत जाणे किंवा बाहेर जेवायला जाणे अशा गोष्टी करायचो. मात्र, आता घरुनच काम सुरु असल्याने काम संपल्यानंतर नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, यु-ट्यूब अशांकडे आपण वळत आहोत.

चला निवडूया तुमच्या शरिरासाठीचा व्यायाम!

काम संपल्यानंतर आपण स्क्रीनशिवाय आपला वेळ घालवू शकतो. कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे, पुस्तक वाचणे किंवा स्वयंपाक बनवणे अशा गोष्टी आपण करु शकतो. एकाच जागी स्क्रीनसमोर जास्तवेळ बसून राहिल्याने पाठदुखीचाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या शरिराची हालचाल जितकी जास्त तितके आपण निरोगी राहू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laptop and mobile screen seeing is dangerous for long time take care tips