Masturbation: स्त्रियांच्या हस्तमैथुनावरून गहजब का होतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Masturbation

Masturbation: स्त्रियांच्या हस्तमैथुनावरून गहजब का होतो?

Sex Education: माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सगळेच हस्तमैथुन करतात. स्वत:ची लैंगिक इच्छा स्वत:च शमवणे म्हणजे हस्तमैथुन. माणसं, माकडं,कुत्रे आणि जलचरसुद्धा हस्तमैथुन करतात. माणसे हस्तमैथुन करतात म्हणून स्त्रीयांवरचे लैंगिक अत्याचार कमी होतात असं खरं तर अनेकांना वाटत असेल. मग स्त्रीया जर का हस्तमैथुन करत असेल तर त्यावर समाजाचा आक्षेप का?

साध्या चित्रपटाचं जरी उदाहरण घेतलं तरी तुम्हाला या विषयाचं गांभीर्य लक्षात येईल. एखाद्या चित्रपटात महिलेला हस्तमैथुन करताना दाखवल्या गेल्यास सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात होते. आणि महिलांच्या खऱ्या आयुष्यात या विषयावर बोलायला गेल्यास ज्या महिलांचं लैंगिक समाधान होत नाही किंवा त्यांनी कधी केलंच तर ज्याचा त्यांना गिल्ट येतो त्याविषयी मग काय बोलायचे?

मुळात आता बायका हस्तमैथुन करतात का असाही प्रश्न तुम्हाला उद्भवू शकतो. तर हो, पण त्यांचा प्रवास पुरुषांईतका सोपा नसतो. पुरूषांना हस्तमैथुनाबाबत विचारल्यास ते एकदा बोलतीलही. पण महिला मात्र त्यांच्या पतीलाच न बोलू शकणारा विषय इतरांना तरी कसा सांगतील. पण आकडेवारी जर का बघितली तर लक्षात येईल की हस्तमैथुन करण्यात स्त्रीयाही कुठेच मागे नाहीत. जगभऱ्यात सुमारे ६२ टक्के स्त्रीया हस्तमैथुन करतात. हैदराबादमधील सेक्सॉलॉजिस्त यांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब निदर्शनास आली.

हेही वाचा: Gay Sex गुन्हा नाही, कलम 377 A लवकरच रद्द करणार; सिंगापूर PM यांची घोषणा

मुळात हस्तमैथुन करण्याचे तोटे काही नाहीत. उलय शरीरात मुड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला यामुळे लैंगिक आजाराचा धोकाही होत नाही आणि गरोदरपणाची भीतीही नसते.

हस्तमैथुनाचे महत्वाचे फायदे

स्लीप मेडिसीन या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार हस्तमैथुनामुळे restless leg syndrome (मज्जासंस्थेचा एक आजार ज्यामुळे सतत पाय हलवण्याची इच्छा होते आणि बैचेन व्हायला होतं) बरा होण्यासही मदत होते.

तसेच लैंगिक तणावात वावरणाऱ्या भारतीय महिलांना यामुळे थोडं हलकं आणि रीलॅक्स फिल होण्यास मदत होते.

हेही वाचा: Sex Education : पुरुषांना आवडत नाहीत या पाच 'लैंगिक क्रिया'

स्त्रीया हस्तमैथुन का करतात?

स्त्रीयांच्या स्वत:च्या लैंगिक ईच्छा असतात. त्या जर का पुरुषांकडून पूर्ण होत नसतील तर त्या हस्तमैथुन करतात.

तर काही महिलांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना हस्तमैथुन करण्यास आवडतं कारण यात त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवणारं नसतं आणि तुम्हाला काय आवडतं काय नाही याचा अंदाज महिलांना येतो.

हेही वाचा: Sex Education संदर्भात मुलांसोबत बोलायचंय? या टिप्स फॉलो करा, संकोच वाटणार नाही

स्त्रीयांच्या हस्तमैथुनावरून गहजब का होतो ?

स्त्रीयांनाही लैंगिक इच्छा आकांशा असतात पण समाज मात्र या गोष्टीला चुकीच्या दृष्टीकोणातून बघत असतो. एक स्त्री स्वत:च्या लैंगिक इच्छा स्वत:च पूर्ण करू शकते यावर समाजाचा विश्वास नाही. असा प्रयत्न ज्या करतात त्यांचा संबंध मग नैतिकतेशी जोडला जातो. एखाद्या स्त्रीचं असं करणं समाजात वेगळ्या दृष्टीनं बघितल्या जातं. मात्र मुळ विषय धरायला गेल्यास हे स्पष्ट आहे की अनेक स्त्रीया या हस्तमैथुन करत असतात मात्र त्याची कल्पना कोणालाच नसते.

टॅग्स :womenMenhealth