पुरूषांना येतो स्त्रियांपेक्षा जास्त घाम!अशी आहेत कारणं

man feel-the-heat more then women
man feel-the-heat more then women

उन्हाळ्यात अनेकांना प्रचंड घाम येतो. काहींना हा घाम अजिबात सहन होत नाही. पण घाम येणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याचे मानले जाते. शरीराचे सामान्य तापमान 98.6°F असते. परंतु हे तापमान वेगवेगळ्या लोकांमध्ये भिन्न असू शकते. काहीवेळा शरीराचे तापमान हे वय किंवा तुमच्या दिवसभरात केलेल्या कामांवरही अवलंबून असते. असे काही लोक आहेत ज्यांना इतरांपेक्षा जास्त गरम होते. असे गरम झाल्याने त्यांना घामही जास्त येतो. पुरूषांना घाम येण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

man feel-the-heat more then women
Fire Boltt Ring 2: खिशातून फोन न काढताही करता येणार कॉल! असे आहेत आकर्षक फिचर्स

वय- तरुणांच्या तुलनेत वृद्ध लोकं त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत, कारण वयानुसार त्यांचे चयापचय मंदावते. अशामुळे या लोकांच्या शरीराचे तापमान खूप कमी होऊ शकते. यामुळेच वृद्ध लोकांना हायपोथर्मिया होण्याची शक्यता जास्त असते. जे लोक घड्याळ्याच्या काट्यावरचे फास्ट आयुष्य जगतात त्यांना या समस्येचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो.

लिंग- पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरात कमी स्नायू असतात. त्यामुळे त्यांच्या त्वचेच्या छिद्रांमधून कमी प्रमाणात उष्णता निर्माण होते. म्हणून त्यांना पुरुषांपेक्षा कमी उष्णता जाणवते आणि घामही कमी येतो. पण, रजोनिवृत्ती आणि मध्यम वयातील महिलांना पुरुषांपेक्षा जास्त उष्णता जाणवते. कारण या काळात त्यांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होत असतात.

man feel-the-heat more then women
Belly Fat कमी करण्यासाठी 'हे' उपाय केल्याने होतील फायदे
Greater body fat linked to reduced mental abilities Study
Greater body fat linked to reduced mental abilities Study

शरीराचा आकार- तज्ज्ञांच्या मते, खूप उष्णता किंवा थंडी जाणवण्यामागे शरीराचा आकार हे कारणही असू शकते. सिडनी विद्यापीठातील फिजियोलॉजीचे संशोधक ओली जे यांच्या मते, शरीराचा आकार जितका मोठा तितकी उष्णता जास्त जाणवते आणि त्यामुळे शरीर थंड होण्यास जास्त वेळ लागतो.

शरीरातली चरबी- काही संशोधनामध्ये, ज्या लोकांच्या शरीरात चरबी जास्त असते, त्यांना इतरांपेक्षा जास्त उष्णता जाणवते, असे आढळून आले आहे. कारण जास्त चरबी असेल तर ती तुमच्या शरीराला गरम करते. जेव्हा आपल्याला गरम वाटते तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या पसरतात. त्यामुळे जास्त रक्त वाहून ते आपल्या त्वचेपर्यंत जाते. त्यामुळे त्वचेद्वारे उष्णता बाहेर पडते. पण, ज्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असते त्यांच्या त्वचेखाली साठलेली चरबी उष्णता बाहेर पडू देत नाही. त्यामुळे त्यांना बराच वेळ उष्णता जाणवत राहते.

man feel-the-heat more then women
Maharashtra Government मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती,असा करा अर्ज

वैद्यकीय स्थिती- काही आजार शरीराच्या तापमानावरही परिणाम करू करतात. उदाहरणार्थ, हायपोथायरॉईडीझम, ज्याला अंडरएक्टिव्ह थायरॉईड म्हणूनही ओळखतात.जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेशी संप्रेरक तयार करत नाही. त्यामुशे चयापचय, उर्जा पातळी इत्यादीसारख्या महत्त्वपूर्ण शारीरिक कार्यांचे नियमन करण्यात मदत होते, तेव्हा एखाद्या व्यक्तीला थंडी जाणवते. Raynaud's हा असा एक आजार आहे ज्यामध्ये शरीराचे काही भाग उदा- तळवे, पायाची बोटे थंड होतात. काही वेळा बधीर होतात. हे थंड हवामानात किंवा तणावामुळे होऊ शकते.

man feel-the-heat more then women
पुरुषांना महिलांपेक्षा १० वर्ष आधी हार्ट अ‍ॅटकचा धोका, संशोधन समोर आली माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com